
Fitness (केवल) एक शब्द नही बल्की स्वस्थ और समृद्ध जीवन की शर्त है – पंतप्रधान
फिट इंडिया मुव्हमेंट
गुरुवारी आपण भारतामध्ये राष्ट्रीय खेळ दिवस साजरा करतो आहोत. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने या दिवसाला राष्ट्रीय खेळ दिवस म्हणुन साजरे केले जाते. गेली अनेक वर्षे हा दिवस साजरा होतो आहे. पण या प्रसंगाचे महत्व व औचित्य काही वेगळेच आहे.
आज आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी फिट इंडिया मुव्ह्मेंट या अत्यंत महत्वकांक्षी जन-आंदोलनास सुरुवात केली. आज दिल्ली येथे जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाची सुरुवात क्रिडा मंत्री किरण रिजिजु यांनी स्वागत व प्रास्ताविक करुन केली. त्यानंतर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खरतर आजवर आपण याला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणत आलो आहोत. पण आजच्या कार्यक्रमाने, सादरीकरणाने हे दाखवुन दिले की जरी हे सारे संस्कृतीशी निगडीत असले तरी, देखील यांमध्ये फिटनेस म्हणजे निरामय आरोग्य कशापध्दतीने मिळविता येते व कशापद्धतीने भारताच्या सर्वच प्रांतांमध्ये विविध खेळ, क्रिडा, नृत्य, इत्यादी मधुन फिटनेस सांभाळले जात होती. तुम्ही जर हा कार्यक्रम पाहिला नसेल तर खालील व्हिडीयो मध्ये अवश्य पहा.
हा कार्यक्रम पाहताना मला तर एकात्म भारताचेच दर्शन होत होते. सोबतच भारताच्या संस्कृतीमध्ये फिटनेसला किती महत्व होते हे देखील समजत होते. युवा-युवती, आबाल-वृध्द असे हजारो स्वयंसेवक या कार्यक्रमाच्या सादरीकरणामध्ये प्रत्यक्ष सहभागी होते. स्वतः पंतप्रधानांनी या कार्यक्रमाचे भरभरुन कौतुक केले.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी सांगितले की, या कार्यक्रमामध्येच योग्य तो संदेश, उपदेश दिलेला आहे.
या भाषणामध्ये पंतप्रधान श्री मोदींनी अनेक महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला. यातील सर्वात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे जीवनशैलीमुळे होणारे आजार. लाईफस्टाईल डिसऑर्डर. जे लोक माझे लेख नियमित वाचत असतात, त्यांना या जीवनशैलीशी निगडीत व्याधींविषयी सविस्तर माहिती असेलच. या विषयावरील सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
आम्ही आमच्या क्लब मेंबर्संना देखील नेमके हेच सांगत व शिकवित असतो. सोबतच ही काळजी देखील घेतोच की त्यांच्या कडुन हेल्दी ॲक्टीव्ह लाईफस्टाईल जगली जाईल. आम्हाला आमचे हे काम अगदी थोडेच दिवस करावे लागते, मग मात्र ती व्यक्तिच या हेल्दीॲक्टीव्ह लाईफस्टाईल ने इतके प्रभावित होतात की मग त्यांना आमच्या मार्गदर्शनाची गरजच राहत नाही.
आजपर्यंत आमच्या सारखे काही मोजकेच लोक जीवनशैलीतील बदलांविषयी बोलायचे. आमचे हे आहे की आजार येईपर्यंत वाट पहायची नाही तर आजार होऊच नये म्हणुन जीवनशैली मध्ये सकारात्मक बदल करायचा. जीवनशैलीतील बदल म्हणजे आहार व विहार यांना आपल्या जीवनामध्ये, दररोजच्या जगण्यामध्ये समाविष्ट करुन घेणे.
आज मात्र, आपल्या देशाचे खुद्द पंतप्रधान देखील हेच बोलत आहेत. ही गोष्ट , आपणा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. देशाचे नेतृत्व जनतेच्या निरामय आरोग्यासाठी, निरामय जीवनासाठी महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेत आहे हे देश व देशातील जनता या दोहोंच्या दृष्टीने खुप लाभाचे आहे.
सामाजिक जीवनामध्ये मी माझा राजकीय दृष्टीकोण, मत माझ्यापुरतेच मर्यादीत ठेवतो मागील पाच वर्षांपासुन. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा, संघटनेचा सक्रिय सदस्य नाहीये. व कुणीतरी माझ्यामुळे प्रभावित एखाद्या राजकिय पक्षाच्या पाठीशी उभे रहावे असेही मला वाटत नाही. तरीही युवा व क्रिडा मंत्री किरण रिजिजु व माननीय पंतप्रधान मोदींचे, आज राष्ट्रीय खेल दिवसाच्या व फिट इंडीया मुव्हमेंट च्या शुभारंभाच्या निमित्ताने, मी मनापासुन कौतुक करतो.
फिट इंडीया ही काही इतर सरकारी योजनेसारखी स्कीम नाहीये मित्रांनो. या योजनेतुन तुम्हाला वस्तु, पैसा, अनुदान आदी स्वरुपात कसलाही लाभ होणार नाही. पण लाभ होणारच नाही का?
तर लाभच लाभ होणार आहे.
माननीय मोदींजींनी आपल्या भाषणात एक वाक्य उच्चारले. मला ते वाक्य खुपच भावले. ते वाक्य असे आहे,
”Fitness (केवल) एक शब्द नही बल्की स्वस्थ और समृद्ध जीवन की शर्त है !”
फिटनेस हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. फिटनेस म्हणजे स्वस्थ म्हणजे निरोगी व समृध्द जीवनाचा पाया आहे. आपण फिट असु तरच आपण आयुष्यातील इतर सगळ्या गोष्टी उत्तम प्रकारे करु शकतो.
मोदीजींनी अजुन एक उदाहरण दिले ते ही माझ्या कायमचे लक्षात राहिले. जगभरातील सर्वात यशस्वी व्यक्तिमत्व पहा. हे लोक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जरी कार्यरत असले तरी, त्यांचे विषय, विद्वत्ता, कौशल्य जरी भिन्न भिन्न असले तरी, त्या सर्वांमध्ये एक साम्य आहे. आणि हे साम्य म्हणजे केवळ योगायोग नाही मित्रांनो. हे साम्य म्हणजे त्या त्या लोकांचा फिटनेस वर असलेला फोकस.
अत्यंत प्रेरणादायी व कार्यप्रवृत्त करणारे असे हे पंतप्रधानांचे भाषण देखील तुम्ही अवश्य ऐका.
फिट इंडिया मुव्हमेंट मध्ये आपण काय करु शकतो?
- विहारातील सकारात्मक बदल – आपण नित्य नियमित व्यायाम करु शकतो. विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेट शिवाय देखील आपण व्यायाम केला पाहिजे. शक्य असेल तर गॅजेट वापरा. पण गॅजेट्स आपल्या साठी आहेत आपण गॅजेट्स साठी नाही हे विसरु नका.
- आहारातील सकारात्मक बदल – फास्ट फुड, तळीव मळीव खाणे टाळा. संतुलित आहार घ्या. योग्य प्रमाणात प्रोटीन्स, मिनरल्स व कार्बोहायड्रेट्स चा पुरवठा शरीरास नेमाने करा. व्यसने नको.
बास – आपणास फक्त या दोनच गोष्टी करायच्या आहेत. आपल्या प्रत्येक व्यायामाचा फोटो, व्हिडीयो सोशल मीडीयावर टाका. सोबत हे हॅशटॅग देखील वापरा. #FITIndiaMovement #KheloIndia
चला तर मग मित्रांनो, फिट इंडियाला, आपण ख-या अर्थाने एक जन-आंदोलन बनवुयात. एका सशक्त भारताच्या, एका श्रेष्ट भारताच्या निर्मितीसाठी भारतातील प्रत्येक नागरीक फिट, निरोगी, निरामय असणे गरजेचे आहे.
आजच्या या कार्यक्रमाचा हा व्हिडीयो अवश्य पहा!
वाचत रहा माझे लेखन व प्रतिक्रिया अवश्य द्या. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी , खालील फॉर्म भरुन पाठवा!
चला तर मग निरामय निरोगी जीवन जगण्याचा निर्धार करु व व्यायाम आपल्या सवयीची भाग बनवुयात.
कळावे
आपले
महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525
Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below.