Stay Fit Pune - The weight loss center

पल्लवी ठोंबरे

फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन !

हे वाक्य आपण अगदी शालेय जीवनापासुन ऐकत आलो आहोत. आपल्या आधीच्या पिढीतील लोकांना प्रेझेंटेशन वगैरे शी फार काही देणे घेणे नव्हते.  साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सारख्या गोष्टी आपल्या समाजात अगदी खोलवर रुजलेल्या आहेत. त्यात ही स्त्रियांना पुर्वी समाजाभिमुख होण्याच्या फार जास्त संधी नसायच्या. आणि अगदीच अशी वेळ आलीच तरी देखील अशा प्रसंगांचा आपल्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या यशापयशाशी तसा फारसा संबंध नसायचा.

हल्ली स्त्री ला अनेक जबाबदा-या पार पाडाव्या लागतात. ती अगदी गृहीणी जरी असली तरी मुलांकडे लक्ष देणे, त्यांच्या शाळांमध्ये पॅरेंट टीचर मिटींग ला जाणे, घरगुती किरकोळ खरेददारी, सोशल फंक्शन, लग्न कार्ये, मुलांच्या वाढदिवस पार्ट्या, नव-यासोबत कधीतरी एखाद्या सभा समारंभात भाग घेणे आदी गोष्टी आजकाल अगदी गृहीणींना देखील टाळता येत नाहीत.

आणि स्त्री जर नोकरी व्यवसाय करणारी असेल तर तिच्या प्रेसेंटेशन चा सरळ संबंध तिच्या करीयरच्या चढत्या किंवा उतरत्या आलेखाशी असतो. त्यामुळे प्रेझेंटेशन हा आजच्या काळातील अगदी महत्वाची गरज होऊन बसली आहे.

आपल्या समाजातील कुलीन स्त्रियांचा थाट अशा समारंभामध्ये पाहण्यासारखा असतो. मुळातच खानदानी आणि त्यात ही त्यांच्या शरीरावरील आकर्षक उंची सुवर्णालंकाराने या स्त्रिया म्हणजे साक्षात गजलक्ष्मी असल्यासारखेच वाटते.

पण या गजलक्ष्मीं च्या फर्स्ट इंप्रेशन मध्ये तिच्या चेह-यावर एक अनावश्यक दागिना देखील दिसतो. हा दागिना इतका हळु हळु तिच्या चेह-यावर कायमस्वरुपी बसतो की खुद्द तिलाच कळत नाही की तिच्या चेह-यावर हा दागिना कधी आला?

पण या दागिन्याने आपल्या गजलक्ष्मीच्या थाटात व सौंदर्यात कसलीही भर पडत नाही. उलट या दागिन्याने तिचे सौंदर्य व रुबाब कमीच होतो.

हा दागिना कोणता?

आमच्या क्लब मधील एक महिला सदस्य. आमचा विशेष ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम करण्याच्या आधीचा त्यांचा फोटो.

आमच्या क्लब मधील एक महिला सदस्य. आमचा विशेष ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम करण्याच्या आधीचा त्यांचा फोटो.

हा दागिना आहे, स्त्रीच्या हनुवटीच्या खाली व गळ्याच्या वर, लटकणारी चरबी. आता,लगेच तुमच्या हनुवटीच्या खाली असलेल्या चरबीला एका चिमटीमध्ये पकडण्याचा प्रयत्न करा. आरशात लगेच बघा म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा हा दागिना तुमच्या चेह-यावर कसा उठुन दिसतोय ते.

इंग्रजी मध्ये या प्रकारास, डबल किंवा डुप्लिकेट चिन (चिन म्हणजे हनुवटी) म्हणतात. आपल्या शरीरामध्ये जर अतिरीक्त कॅलरीज अनेक वर्ष जमा होत राहिल्या तर त्याचे रुपांतर हळु हळु या प्रकारच्या डबल हनुवटी मध्ये होते. जर तुमचे वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणात असेल तर, तुम्ही मानेचे, गळ्याचे विविध व्यायाम करुन ही चरबी हळु हळु घालवु शकता. पण त्यासाठी सर्वात महत्वाचा बदल करणे गरजेचे आहे व तो म्हणजे सकस, संतुलित आहार.

तुम्हाला जर अशी हनुवटीच्या खाली लटकणारी चरबी असेल तर सर्वात प्रथम तुम्ही तुमचा बी एम आय तपासुन घ्या. तुमचा बी एम आय तपासण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचा प्रोग्राम यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर, डबल चिन म्हणजे हनुवटी खालची चरबी तर गेलीच, सोबत स्लिम आणि ट्रिम शरीर यष्टीदेखील मिळवली...

आमचा प्रोग्राम यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर, डबल चिन म्हणजे हनुवटी खालची चरबी तर गेलीच, सोबत स्लिम आणि ट्रिम शरीर यष्टीदेखील मिळवली…

जर तुमचा किती आहे हे तपासुन , अवश्य मला फोन करा, मी तुम्हाला तुमच्या बी एम आय नुसार सल्ला देऊ शकेन.

चला तर तुमचे फर्स्ट इंप्रेशन बेस्ट इंप्रेशन बनवुयात.

कळावे

पल्लवी ठोंबरे – 9765702525

तुमची निरामय जीवनाची सांगाती

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.