Stay Fit Pune - The weight loss center

उपवासामुळे वाढते वजन

श्रावणातील उपवासाचे तंत्र आणि मंत्र

आपला भारत देश अजब रसायन आहे. हजारो वर्षांपासुन आपल्या संस्कृतीने आपल्याला अनेक रुढी परंपरा दिल्या. या रुढी परंपरा खरतर उदात्त हेतुंनी प्रेरीत अशा महान शास्त्रज्ञ ऋषिमुनींनी, खुप अभ्यास केल्यानंतर समाजाच्या कल्याणासाठी दिल्या.

कालांतराने या रुढी परंपरांमध्ये अनिष्ट आले. मुळ अर्थ व हेतु दिसेनासे झाले. व राहिले नुसते परंपरांचे सांगाडे.

श्रावणात हवामानामध्ये सातत्याने बदल होत असतात. कधी उन तर कधी पाऊस, दमट हवा, ढगाळ वातावरण, या सगळ्यामध्ये आपले शरीर देखील एका स्थित्यंतरामधुन जात असते. या स्थित्यंतरामध्ये आपल्या शरीराला विशेष काळजीची गरज असते. व ही काळजी कशी घ्यावी व सर्वांनी ही काळजी घ्यावी म्हणुनच आपल्या पुर्वजांनी श्रावण मासाचे व्रत उपवास आदींचे प्रयोजन केले होते.

श्रावण मासामध्ये व्रताचरण करुन आपण मनाची शांती, आनंद यांचा अनुभव सहज गत्या घेऊ शकतो. पण हा अनुभव घेण्यासाठी आपले मुख्य साधन आहे ते म्हणजे आपले शरीर. आपले शरीरच जर बिघडले पडले तर आपण परमेश्वराचे अधिक जवळ तरी कसे जाऊ शकणार?

श्रावणात उपवास कसा करावा हे आपण पाहुयात. पण त्यापुर्वी आपण हे जाणुन घेऊयात की श्रावणात उपवास कसा करु नये ते.

उपवास कसा करु नये?

आपण उपवास करीत असु किंवा उपवास नसु,  दोन्ही वेळेस आपणास, आपल्या शरीरास ठराविक अशा कर्बोदकांची (कार्बोहायड्रेट्स), जीवनसत्वांची, प्रथिनांची (प्रोटीन्स ची), खनिज व अनेक अशा पोषक तत्वांची आवश्यकता असते. उपवास मनाच्या व शरीराच्या पावित्र्यासाठी केले जातात. शुचिता आपल्यात येण्यासाठी व आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्यासाठी केले जातात. पण आपण नेमके मुळ हेतु कडे जाण्यासाठी मार्ग सुलभ करण्याऐवजी आपण चुकीचे उपवास आपल्या आध्यात्मिक मार्गात एका अर्थाने अडथळेच निर्माण करीत असतो.

उपवासामुळे वाढते वजन

चुकीच्या उपवासामुळे वाढते वजन, चक्कर, थकवा येतो

हे अडथळे नुसते पारमार्थिक मार्गातच नसतात तर या चुकीच्या उपवासामुळे आपण आपल्या शरीरास देखील अपाय करुन घेत असतो. ते कसे हे आपण आता पाहुयात.

उपवास करतेवेळी आपण नेहमी पेक्षा खुपच कमी अन्न खात असतो. किंवा अजिबात खात नाही, किंवा तळीव मळीव पदार्थ खात असतो. दिवसभर उपवास करुन (वरील तीनपैकी एका प्रकारे) आपण रात्रीच्या वेळी आपण उपवास सोडतो व दिवस भराची कसर काढतो.

वर सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरास कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, पोषकतत्वे आदींची गरज असते. व ती गरज आपण खात असलेल्या अन्न पाण्यातुनच भागली जाते. उपवासा व्यतिरिक्तच्या दिवसांमध्ये आपण आपल्या या गरजा आपण खात असलेल्या अन्नामधुन भागवीत असतो. पण आपण खात असलेल्या अन्ना अधुन खरच आपल्या या गरजा पुर्ण होत असतात का?

आपण खाल्लेल्या अन्नामध्ये प्रथिनांचा समावेश असतो. अन्न शरीरामध्ये गेले की पचन प्रक्रियेमध्ये अन्नामधुन या पोषक तत्वांना आपले शरीर शोषुन घेते. व आपल्या शरीराची गरज भागवण्याचा प्रयत्न केला जात असतो.

भारतीय आहारामध्ये ते ही विशेषतः शाकाहारी आहारामधुन मिळणारी प्रथिने आपले शरीर शोषुण घेण्याची शरीराची क्षमता मांसाहारापेक्षा कमी असते. त्यामुळे उपवास नसतानासुध्दा आपण खाल्लेल्या शाकाहारी आहारामधुन आपणास योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळत नाहीत. याचाच परीणाम असा दिसतो की वारकरी सांप्रदायातील बहुतांश लोकांची पोटे सुटलेली असतात. पोट सुटणे हे शरीराला पोषक तत्वे न मिळण्याचे लक्षण आहे. शाकाहारी लोकांना शाकाहारी प्रथिने कशी मिळु शकतात या विषयी आपण पुन्हा कधीतरी पाहुयात.

आज आपण पाहुयात चुकीच्या पध्दतीच्या उपवासाने काय नुकसान होते ते!

अन्न आणि पोषकतत्वे या मध्ये फरक आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न पोटभर खाऊन, पोट भरल्यासारखे वाटेल पण शरीराचे पोषण होणार नाही.  पोषक तत्वे म्हणजे काय तर आपल्या शरीराची गरज. पोटाची नव्हे!

चुकीचा उपवास म्हणजे काय तर दिवसभर काहीच न खाणे किंवा तळलेले खाद्य पदार्थ खाणे किंवा दिवसातुन १० –  १२ वेळा चहा पिणे हे होय.

दिवसभर आपण उपाशी राहिल्याने रात्री उपवास सोडताना आपण जे काही खातो त्याचा उपयोग शरीरामधेय स्नायु वाढण्यासाठी न होता शरीरातील चरबी वाढण्यासाठी होतो.  जो पर्यंत आपण उपवास सोडत नाही तो पर्यंत आपणास उत्साहवर्धक वाटण्याऐवजी थकवा आल्यासारखे वाटत असते. व आता मला सांगा की थकलेले शरीर कधीतरी परमेश्वराच्या पवित्र विचारांचे निवास स्थान होऊ शकेल का?

नुसतेच थकल्यासारखे वाटते असे नसुन, अनेकदा मी पाहिले आहे की बरेच जणांना चक्कर येणे, हात पाय थरथर कापणे आदी सारख्य्या गोष्टी देखील होतात.

आपल्या आध्यात्मिक, पारमार्थिक उन्नतीसाठी सुदृढ शरीराची गरज असते. व ही गरज उपवास योग्य पध्दतीने करुनच भागु शकते.

पुढील भागामध्ये आपण पाहुयात की उपवास योग्य पध्दतीने कसा करावा.

धन्यवाद

आपला निरामय आयुष्याचा सांगाती

महेश व पल्लवी ठोंबरे

पुणे

Contact us for easy weight loss in Pune.

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.