
ट्रेंड आजकालचा …
एक किस्सा
एकदा माझ्या एका मित्राने एक किस्सा सांगितला. अरविंद तसा अट्टल संस्कृती जपणारा, तसेच आरोग्याविषयी सतर्क असा होता. एक चांगला नवीनच सिनेमा नुकताच प्रदर्शित झालेला होता. सिनेमा बहुचर्चित आणि त्याच्या आवडीच्या विषयावरचा होता. त्यामुळे, त्याने सहकुटुंब सिनेमा पहायला जायचा बेत केला. तसेही लग्न झाल्यापासुन तो कधीही तिला घेऊन सिनेमाला गेलाच नव्हता. म्हणुन ऑफीस मधुन घरी जाताना, त्याने सुट्टीच्या दिवसाची तीन तिकीटे काढुन आगाऊ बुकींग केले. मोठ्या उत्साहात बायकोच्या हातात, तिकिटे देऊन त्याने तिला सगळा बेत सांगितला. बायको सुध्दा जाम खुष झाली. तिने तिकीटे पुन्हा नव-याच्या हातात देऊन व्यवस्थित सांभाळुन ठेवायला सांगितली. त्याने तिकीटे कपाटामध्ये जपुन ठेवली.
शनिवारी संध्याकाळी, तो तिला म्हणाला उद्या सिनेमाला जाण्यासाठी तुला सकाळी थोडे लवकर उठुन तयारी करावी लागेल. कसली तयारी असे तिने विचारले. तर तो म्हणाला, आपण थियेटर मध्ये गेल्यावर तिथले काहीच नको खायला! आपण आपला मस्तपैकी जेवणाचा डबा घरुनच घेऊन जाऊ किंवा घरुनच काहीतरी चांगले खायचे घेउन जाऊ. नव-यासोबत, लग्नानंतर सिनेमाला जायची पहीलीच वेळ आणि नवरा एवढा उत्साहाने बोलताना पाहुन तिने चक्क होकार दिला व मी छानपैकी काहीतरी खाण्यासाठी घरीच बनवुन नेईन असे म्हणाली.
झाले, रविवारचा दिवस उजाडला. तो रविवार असल्याने, सुट्टी असल्याने थोडा उशिरा उठला. सिनेमाची वेळ अगदी अर्ध्या तासावर आली होती. जागा होताच बघतो तर काय, ती देखील अजुन ही झोपुनच होती. आता सिनेमा ला जायचे होणार नाही या भीतीने, त्याने पटापट तिला हलवुन जागे केले. तिला म्हणाला , पटकन आवर, मी खाली फळवाल्याकडे जाऊन, काही फळ आणि मस्तपैकी लस्सी आणतो, म्हणजे आपण लगेच निघु. ती देखील हो म्हनुन तयार झाली. फळ घेऊन आला. कपड-लत्ते सगळ झाल, आता तिकीटे कपाटातुन घेऊन निघायचे म्हणुन कपाटात पाहीले तर, तिकीटे गायब झालेली. दोघांनी मिळुन खुप शोधली, पण तिकीटे काही सापडली नाहीत. तो जरा जास्तच दुःखी झाला. तिने थोडी सांत्वना केली.
पुढे दोन तीन वर्षांनी, पुन्हा एकदा असाच सिनेमाचा विषया निघाला, तर तिने लागलीच सांगितले, की तुम्हाला ते फळ, जेवणाचा डबा वगैरे वगैरे सिनेमा हॉल मध्ये न्यायचे असेल तर तुम्हीच जा सिनेमाला. मी आणि मुलं नाही येणार. मग त्याला मागचा प्रसंग आठवला, व हळुवार पणे त्याने, सिनेमागृहातील अखाद्य पदार्थांना होकार दिला. लागलीच तिने सांगितले, की मागच्या वेळेस, तुम्ही फळ आणायले गेले तेव्हा मीच कपाटातुन तिकीटे काढली आणि फाडुन फेकुन दिली होती. शेवटी हतबल झालेला अरविंद सहकुटुंब सिनेमा बघायला गेला.
हा किस्सा ऐकल्यावर आम्ही दोघेही खुप हसलो होतो. पण, हे मात्र हसुन दुर्लक्ष केल्यासारखेच झाले.
एक विदारक वास्तव
सुट्टीच्या दिवशीचा, म्हणजे आठवड्यातुन एकदा तरी नक्की, एक पक्का कार्यक्रम आजकाल प्रतिष्टेचा झालेला आहे. ज्याच्या कडे चारचाकी असेल तो चारचाकी मध्ये, आणि ज्याच्या कडे दुचाकी असेल तो सहकुटुंब दुचाकीवर, निघतात घराबाहेर. महिला व पुरुष दोघे ही नोकरी व्यवसाय करणारे आजकाल जास्त असतात. नोकरीच्या रोजच्या ताणतणावातुन एक दिवस तरी थोडे वेगळेपण म्हणुन आपण घराबाहेर पडतो. कित्येकदा बाहेर जायचे म्हणजे नक्की कुठे जायचे हे देखील माहीत नसते किंवा ठरलेले नसते. गाडी सुरु केल्यावर ठरते कुठे जायचे ते. अमुक तमुक ठिकाणी जाणे तसे गरजेचे नसते,पण रोजच्या धकाधकीतुन सुट्टी म्हणुन, थोडा बदल म्हणुन आपण ब-याचदा असे करीत असतो.
सहकुटुंब फिरण्यासाठी घराबाहेर पडणे, हा जसा एक ट्रेंड झालाय तसाच आणखी एक भयानक ट्रेंड हल्ली पहायला मिळतो. हा ट्रेंड इतका क्रिटीकल आहे की याच्या मोहमायेमुळे आपणास हा ट्रेंड अतिशय घातक आहे असे माहित असुन देखील, आपण त्याच्या आहारी जातोच. आपणास हे पक्के माहित आहे की, ह्या ट्रेंड मुळे माझे आरोग्य नुसतेच खराब होत आहे तर मला अतिशय दुर्धर असे महाभयानक रोग होण्याची देखील भीती आहे. माझे वजन वाढण्यास, हृद्यरोग, रक्तदाब वाढण्यास, किडनेचे विकार, पित्ताशयाचे विकार असे अनेक विकार मला ह्या ट्रेंड मुळे होऊ शकतात. बर, हे फक्त मलाच होईल असे आहे का? तर नाही, मी ज्यांना माझ्या सोबत फिरण्यासाठी नेतो त्यांनी देखील हे सगळे होण्याची ९९% शक्यता आहे. म्हणजे माझे आरोग्य, तसेच मला अतिप्रिय असणा-या माझ्या कुटुंबियांचे आरोग्याशी मी स्वःतच खेळतो आहे.
हा ट्रेंड पुरोगामी सुध्दा आहे. म्हणजे असे की, अरविंदने सिनेमागृहात घरचा डबा खाणे त्याच्या बायकोस मागासलेपणाचे वाटते. बायकोला तसे वाटते म्हणुन नाईलाजाने अरविंदला देखील तसेच वाटते. घरच्या जेवणाच्या ऐवजी, फास्टफुड आणि जंकफुड खाणे म्हणजे आधुनिकपणाचे आणि सुशिक्षितपणाचे लक्षण झाले आहे. फास्टफुड म्हणजे अर्धे तयार केलेले किंवा पुर्ण तयार केलेले, रेडी मेड खाद्य पदार्थ. यात, मैद्याची बेकरी उत्पादने, ब्रेड, जाम सॅंडविच, क्रीमरोल, पॅटीस, भजी (रस्त्यावरची किंवा कोणत्याही हॉटेलातील), तळलेले पदार्थ, बर्गर, पिझ्झा, चायनिस, इत्यादी येते. या फास्टफुड मुळे पोट भरल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात थोड्याच वेळाने पुन्हा भुक लागते. व पुन्हा खावेसे वाटते. याचे धोके तर खुपच आहेत. मॅक्डोनाल्ड म्हणजे मॅक-डी, सर्वांना माहीत असेलच. तर, मॅक-डी च्या प्रशासनाने, त्यांच्या कर्मचा-यांना नुकतेच, पिझ्झा, बर्गर वगैरे न खाण्याचा सल्ला दिला. व त्या ऐवजी काकडी गाजर टोमॅटो आदींचा सलाड खाण्यास सांगितले, व सोबतच घरुन प्रत्येकाने डबा आणावा असा नियम देखील केला. जे कर्मचा-यांना चांगले नाही ते, ग्राहकांना चांगले कसे काय असु शकते?
आणि जंक फुड म्हणजे, आहार निरुपयोगी, मुल्य विरहीत खाद्य पदार्थ. बेसनापासुन तयार केलेले भेळ, पापडी फरसाण कुरकुरे इत्यादी जंक फुड ची उदाहरणे आहेत. या जंक फुड मुळे फक्त वजन वाढते. वजन वाढते म्हणजे, शरीराला अनावश्यक आणि घातक अशा घतकांची शरीरामध्ये वाढ होते.
ह्या फास्ट आणि जंक फुड मध्ये, सोडीयम्चे प्रमाण जास्त असते, त्यामुळे, शरीरातील कॅल्शीयमचे प्रमाण कमी होते. फास्ट फुड च्या सेवनाने, नक्की काय गंभीर परीणाम होतात, पहा
१. स्मरणशक्ती आणि नैसर्गिक शिकण्याच्या क्षमतेमध्ये कमी होणे

२. मधुमेह म्हणजेच डायबेटीज होणे

३. आपल्या भुक लागण्याच्या नैसर्गिक क्षमतेवर विपरीत परीणाम होणे

४. शरीरातील रासायनिक बदलांमुळे, नैराश्य येणे

५. उतावळे व अति रागीट होणे

६. वजन वाढणे

७. कार्यक्षमता कमी होणे
८. नेहमी आळस व कंटाळवाणे वाटणे
ही यादी खुप मोठी आहे.
तर मंडळी, ह्या फास्ट फुड, जंक फुड व कोल्डड्रिंक्स चे धोके वेळीच ओळखा. तुम्हाला जर असे वाटत असेल की वेळ अजुन हातातुन गेलेली नाहीये, तर त्वरीत बाहेरचे खाणे बंद करा.
आणि तुम्हाला असे वाटत असेल की वेळ निघुन गेलीये हातातुन, जर तुम्हाला असे वाटत असेल की फास्टफुड,जंकफुड सारखे विषारी अन्न खाल्ल्यामुळे तुमचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले आहे, तर माझ्याशी संपर्क साधा.
Mohini
Very informative.