Stay Fit Pune - The weight loss center

आता तरी करा व्यायामाला सुरुवात!!

नमस्कार मित्रानो

माझा मागील लेख मन की शरीर ! महत्वाचे काय? या शीर्षकाचा लेख सर्वांनाच आवडला. अनेकांनी तशा प्रतिक्रिया मला दिल्या. तसेच या विषयातील पुढील लेख वाचण्याची उत्सुकता असल्याचे देखील सांगितले. पण दैनंदिन कामातुन वेळ काढुन लिहिणे देखील तसे पाहिले तर अवघड व चित्ताच्या एकाग्रतेचे काम असल्याने यात कधीकधी वेळ लागतो. असा वेळ लागु नये व रोजच्या रोज नव्या उमेदीने आपण सर्वांनी कामे करावीत, आनंदी राहावे, जीवनात सुख व समाधानाचा अनुभव रोजच घ्यावा, असे आपणा सर्वांनाच वाटत असते, बरोबर ना? मला ही वाटते असे! पण असे खरोखरीच दररोज होऊ शकते का? काय आपण आपला प्रत्येक दिवस प्रचंड उत्साह, उमेद व आत्मविश्वासाचा घालवु शकतो का?

याचे उत्तर आहे हो! आपण अगदी रोजच्या रोज सदैव उत्साहामध्ये राहु शकतो, अगदी रोज सुख व समाधानाचा अनुभव घेऊ शकतो. हे अगदी सहज साध्य आहे. हे मी इतक्या ठाम पणे म्हणु शकतो याचे कारण माझा स्वःतचा अनुभव- स्वानुभव, होय.

आमच्या क्लब मेंबर्सचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. या ग्रुप मध्ये आम्ही आरोग्य विषयक चर्चा, पोस्टर्स, माहिती असे बरेच काही शेयर करीत असतो. कालच आमच्या एका क्लब मेंबर ने डॉ राजेव शारंगपाणी यांच्या वर्तमानपत्रातील एका छोट्या लेखाचा फोटो काढुन पाठवला. तुम्हा सर्वांना तो वाचता यावा म्हणुन इथे तो देत आहे. या लेखाचे शीर्षक आहे “आता तरी करा व्यायामाला सुरुवात”

डॉक्टरांनी अगदी मोजक्याच शब्दामध्ये व्यायाम का केला पाहिजे हे सांगितले. अतिशय मार्मिक व छोटेखानी लिखाण आहे. सर्वांनी अवश्य वाचा व शेयर करा आपापल्या मित्र-परीवारासोबत.

weight loss in pune

मला नेमके याच विषयावर या आठवड्यामध्ये लिहायचे होते. डॉक्टरांच्या या लेखामुळे माझे अर्धे काम कमी झाले आहे ;).

या सर्वांच्या काही पाऊले पुढे जाऊन आपण व्यायामाचे महत्व फक्त शरीरस्वास्थ्यापुरतेच मर्यादीत नसुन ते मनस्वास्थ्य, आपले यश, सुख व समाधानाशी कसे काय निगडीत आहे याविषयी सविस्तर माहिती घेऊयात.

मागील लेखामध्ये आपण पाहिले की मन व शरीर हे दोन्ही एकमेकांवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करीत असतात. आपले मन तंदुरुस्त असेल तर शरीर देखील तंदुरुस्त राहते व जर शरीर निरोगी झाले, लठ्ठ झाले तर त्याचा परिणाम मनाच्या आरोग्यावर कसा होतो हे आपण पाहिले.

आमच्या वेबसाईट वरील इंग्रजीमधील पहिल्या एक दोन ओळी वाचल्यानंतर आपणास लागलीच समजेल की आमच्या संपुर्ण कामाचे केंद्रस्थान ॲक्टीव्ह, निरोगी जीवनशैलीचा प्रचार प्रसार करणे. नुसता प्रचार, प्रसार करुन न थांबता, ज्या लोकांना प्रत्यक्ष जीवनमानामध्ये सकारात्मक परिवर्तन आणायचे असेल त्यांना आम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन देखील आमच्या क्लबच्या माध्यमातुन करतो. मुख्य हेतु आहे ‘एक सक्रिय, प्रचंड उत्साह, ऊर्जा यांनी युक्त असे जीवन यापन करणे’

हे असे करीत असताना यामध्ये दोन सर्वात महत्वाच्या बाबींवर आम्ही प्रामुख्याने काम करीत असतो. त्या दोन बाबी म्हणजे मन व शरीर यांचा परस्पर संबंध अधिक सौहार्दाचा करणे.

एक ॲक्टीव्ह लाईफस्टाईल म्हणजे नक्की काय तर सदैव ऊर्जावान असणे. कोणतेही काम समोर कधीही येऊदेत, ते तेवढ्याच, नव्या उत्साहाने करता येणे. पण असे जीवनमान वरकरणी जरी सोपे वाटत असले तरी ज्या लोकांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आहे, त्यांच्यासाठी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल बराच अवघड कार्यक्रम आहे. किंवा त्यांच्यासाठी ते अशक्य कोटीचे काम आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे माझ्या या लेखामधील मार्गदर्शन फक्त अशाच लोकांसाठी आहे की ज्यांचे वजन अजुन मापात आहे.  वजन जास्त असलेल्या लोकांनी काय आणि कसे आपल्या जीवनशैली मध्ये बदल करावेत यासाठी मी पुन्हा कधीतरी विस्ताराने लिहिल.

शरीराचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढणे हे तुमच्या बिघडलेल्या जीवनशैलीचे द्योतक आहे. तुमचे वजन वाढलेले आहे याचा अर्थ तुमच्या दिनचर्येमध्ये खुप मोठा बिघाड झालेला आहे, असे खुशाल समजा. जीवनशैली मधील बिघाड कशामुळे येतो? तर तो येतो बिघडलेल्या मनाच्या आरोग्यामुळे. कारण मागील लेखामध्ये आपण हे पाहिले आहेच. मन व शरीर हे दोन्ही ही एकमेकांवर अवलंबुन आहे. परस्परावलंबी आहेत हे दोन्ही ही घटक. त्यामुळेच आपणास जर एकंदरीत सुखी समाधानी जीवन यापन करायचे असेल तर आपणास मन व शरीर यांतील परस्पर संबंध अधिक चांगला, अधिक सौहार्दपुर्ण करणे गरजेचे आहे. आपल्या मन व शरीरामधील संवाद अधिक चांगला कसा होईल हे खुप महत्वाचे आहे. आणि नेमके याच विषयावर आपण माहिती घेणार आहोत आज.

मन व शरीर यातील परस्पर संबंध सुधारण्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे – व्यायाम. कसे काय?

चला आपण सविस्तर माहिती घेऊयात.

ब्रिटीश-कोलंबिया विद्यापीठातील एका संशोधनानुसार, व्यायाम फक्त स्नायुसंवर्धनासाठीच महत्वाचा नाहीये. मसल्स वाढवणे, अतिरीक्त चरबी जाळणे हे तर व्यायामामुळे होतेच. त्यासोबतच व्यायामातील सातत्य जसे जिम मध्ये व्यायाम, किंवा रनिंग किंवा झुंबा डान्स, किंवा एरोबिक व्यायाम प्रकार, असे जर आपण नित्याने करीत असु तर, आपल्या मेंदुमधील हिप्पोकॅम्पस नावाच्या जैविक घटकाची वाढ खुप चांगली होत असते. हिप्पोकॅम्पस हा घटक आपल्या भाव-भावना, मुड व स्मरणशक्ति वर परिणाम करतो.

ताण-तणावापासुन मुक्ती मिळते व्यायाम केल्याने.

80 % Nutrition , 20% exercise core exercise with my fitness trainerAbs are made in kitchen

Posted by Mahesh Thombare on Thursday, September 8, 2016

ताण-तणावापासुन स्वःतला वाचवण्यासाठी व्यायाम खुप महत्वाचा आहे. अनेकदा डॉक्टर्स डिप्रेशनच्या पेशंटला व्यायाम हा उपाय सांगतात. औषधांचे काही साईडैफेक्ट्स असु शकतात पण व्यायामाचा वाईट असा साईड इफेक्ट अजिबात नाही. व्यायाम केल्याने नुकसान काहीच होत नाही उलट फायदाच अधिक होत असतो. तुम्ही जर जाड-जुड, लठ्ठ नसाल व तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल तर मी खात्रीपुर्वक तुम्हाला सांगु शकतो की तुम्हाला कधी डिप्रेशन सारखा आजार होणार नाही. तसेच जर तुम्हाला आधीपासुनच डिप्रेशन, ताण तणाव असेल व शारीरीक दृष्ट्या तुम्ही ठिक-ठाक असाल तर ताण-तणाव, डिप्रेशन घालवण्यासाठी त्वरीत व्यायामास सुरुवात करा.

व्यायामामे शारीरीक थकवा जरी येत असला तरी त्यामुळे तणाव दुर होतो. तणाव नाहिसा होणे व शारीरीक थकवा यामुळे दररोज रात्री आपणास झोप देखील गाढ लागते.

(माझी बायको म्हणते की मी बिछाण्यावर पडल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांमध्ये ढाराढुर झोपलेला असतो ;).)

योग्य झोप देखील गरजेची आहे निरामय निरोगी जीवनशैलीमध्ये. ताण-तणाव कमी करुन व्यायामतुम्हाला चांगली झोप देतो. सुरुवातीस कंटाळवाण वाटणारा व्यायाम नंतर सवयीचा तसेच आनंददायी होतो. यामध्ये माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की जिम किंवा बंद खोलीतील व्यायामापेक्षा धावणे, चालणे, टेकड्या, डोंगर चढणे उतरणे अशा प्रकारचा व्यायाम आपल्या मानसिक आरोग्यासाठी जास्त लाभदायक आहे.

व्यायामामुळे तुमचा मुड नेहमी चांगला राहतो

Posted by Mahesh Thombare on Saturday, October 6, 2018

 

जॉगिंग करताना पहिला राऊंड कंटाळवाणा वाटु शकतोम, किंवा जिम मध्ये व्यायाम करताना देखील सुरुवातीला थोडा त्रास किंवा कंटाळा येऊ शकतो. पण एकदा का तुम्हाला याची सवय झाली तर मग फायदे फक्त शारीरीक तंदुरुस्तीपुरते मर्यादीत न राहता, आपण आपल्या (प्रत्येक) कामामध्ये मजा अनुभवण्यास सुरुवात करतो. किंबहुना, व्यायामामुळे आपले शरीर व मन दोघेही ही कला शिकुन जातात. तुमचा व्यायाम कसलाही असु शकतो उदा धावणे, चालणे, जिम मध्ये व्यायाम, तालमीमध्ये व्यायाम, खुल्या मैदानावर व्यायाम किंवा  मस्तपैकी नाचणे हा देखील व्यायाम तुम्हाला दिवसभरासाठी भारी मुड देऊ शकतो

व्यायामामुळे व्यसनांना वेसण घालता येऊ शकते

आपणास जेव्हा आनंद होतो, अगदी कधीही बरका! तर जेव्हा जेव्हा आनंद होतो तेव्हा नेमके काय होते शरीरामध्ये माहित आहे का तुम्हाला? मी सांगतो. आपल्या मेंदु मधील पेशींमध्ये डोपामिन नावाच्या एका रसायनाची निर्मीती झाली आपणास आनंदाचा अनुभव होतो. आपण जेवण करताना, किंवा एखादे व्यसन करताना देखील या रसायनाची निर्मिती मेंदु मध्ये होत असते. नशेमध्ये जो आनंद आहे, अगदी त्यापेक्षा जास्त व उच्च आनंदाचा अनुभव व्यायामाने होत असतो. याचे कारण असे आहे की व्यायाम केल्याने देखील मेंदुमध्ये डोपामिन ची निर्मीती होत असते.

व्यायामामुळे पुन्हा तारुण्य येते

 

जसे वय वाढते तसे आपल्या स्मरणशक्ती व संवेदनांच्या क्षमता कमी कमी होऊ लागतात. इंग्रजी मध्ये याला कॉग्नीटीव्ह स्किल्स म्हणतात. पण नेमाचा व्यायाम तुम्हाला म्हातारपणाच्या या लक्षणांपासुन दुर ठेवु शकतो. वाढत्या वयासोबत व्यायाम देखील आपण हळु हळु कमी करावा पण बंद अजिबात करु नये. हलके चालणे, धावणे, शक्य झाल्यास छोटेमोठे खेळ खेळणे यामुळे आपण समाजामध्ये संवाद साधतो व त्यामुळेच म्हातारपण लांब जाते.

व्यायामामुळे आत्मविश्वास वाढतो

 

आपण कसे आहोत हे जास्त महत्वाचे जरी असले तरी आपण कसे दिसतो याचा परिणाम देखील आपल्या असण्यावर होत असतो. व्यामामामुळे आपले बाह्य व्यक्तिमत्व खुलते व त्याचा परिणाम आपोआपच आपला आत्मविश्वास वाढण्यावर होतो. सोबतच व्यायामामध्ये हळु हळु होत असलेली प्रगती देखील आपला आत्मविश्वास नेहमी वाढवते. सुरुवातीस मला अगदी एखादा किमी देखील धावता यायचे नाही. पण हळु हळु मी दोन किमी, तीन किमी, पाच किमी, दहा किमी ते अगदी २२ किमी पर्यंत सलग धावता येण्याइतपत प्रगती केली. हे काही एकदम झाले नाही. मैदानावर एक राऊंड मारल्यावर दुसरा, मग तिसरा असे वीसेक राऊंड मारल्यावर जिंकल्यासारख वाटतं. आणि व्यायामामुळे ही जिंकण्याची सवय अगदी दररोज लागते. जिंकणे आपल्या सवयीचे होते.

याचा सकारात्मक परीणाम आपल्या एकंदरीत आयुष्यात, व्यवसाय, नोकरीमध्ये नकळत व आपोआप होतो. हे माझे अनुभवाचे बोल आहे. तुम्ही करुन पहा, तुम्हाला देखील असा अनुभव येईल.

शेवटचे परंतु खुप जास्त महत्वाचे

व्यायामामुळे आपल्या शरीर व मन यामध्ये समन्वय साधला जातो

तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करीत असाल, धावणे, चालणे, जिम मध्ये वर्कआऊट, पोहणे असो किंवा बॅडमिंटन खेळणे असो,. तेच काय पण अगदी घरातील कामे देखील तुम्ही मन लावुन अधिक चुस्तीफुर्ती ने केली तरी देखील तुम्ही, एक गोष्ट पक्की पक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या स्वःतच्या भल्यासाठी ,खुप चांगले काम करीत आहात. शरीर व मनाचा समन्वय आपणास जसा निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे तसाच तो व्यवसाय नोकरी मध्ये देखील आवश्यक आहे. संपुर्ण जीवनमानामध्ये या दोहोंचा समन्वय जर असेल तर दोघांच्या सौहार्दपुर्ण व्यवहाराने अशक्य वाटणा-या गोष्टी तुम्ही साध्य करु शकता. शरीर व मन यामध्ये ताळमेळ, सौहार्द हे व्यायामाने येते.

त्यामुळे आपण एक गोष्ट समजुन घेतली पाहिजे, ती ही की, व्यायाम नुसत शरीरासाठीच गरजेचा नसतो. नियमित व्यायामाने आपण आपल्या आयुष्यात देखील सर्वच्या सर्व लौकिक ध्येये प्राप्त करुन घेण्याच्या योग्यतेचे बनतो. ही योग्यता मानसिक आरोग्य, बौध्दिक आरोग्य, भावनिक आरोग्य तसेच शारीरीक आरोग्य याद्वारे बनते.

तुम्हाला माझा लेख कसा वाटला हे अवश्य सांगा.

आपला महेश ठोंबरे – 9923062525

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfOTczMTkiLCJ2aWV3X2h0bWxfaWQiOiJjc3BGb3JtU2hlbGxfMTFfOTczMTkiLCJjb25uZWN0X2hhc2giOiI4ODlhYjc4MDczMTYwMzRjMGUxMDM5ZmRjMzI3ZTJmZSJ9

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.