
आपली प्रकृती – पिंड मोठे की ब्रह्मांड?
आपण जिला प्रकृती म्हणतो ती प्रकृती म्हणजे नक्की काय? अगदी साधा सोपा प्रश्न आहे ना?
आपण, व आपल्या अवती भवतीचे जे काही आहे त्या सा-याची मिळुन प्रकृती बनत असते. या प्रकृती मध्ये मुख्यत्वे करुन समावेश आहे तो म्हणजे जीवसृष्टीचा. पृथ्वीतलावर व अवती भोवती साधारणपणे १५ लक्ष प्रकारचे विविध सचेतन-सजीव प्रजाती आहेत. यांची एकुण संख्या 1,000,000,000,000च्या आसपास आहे असा दावा नुकत्याच एका अमेरिकन संशोधन संस्थेने केला आहे. म्हणजे आपली पृथ्वी 1,000,000,000,000 इतक्या प्राणीमात्रांचे घर आहे. 1,000,000,000,000 याला थोडक्यात एक ट्रिलियन असे म्हणुयात. आणि ही खरतर सुरुवातच आहे नक्की आकडा किती आहे याचा शोध अद्याप लागायचा आहे. या सर्व प्रजातींमध्ये प्राणी, वनस्पती, वृक्ष, जीवाणु, विषाणु आदींचा समावेश होतो. या प्रत्येक सजीवाचे ठराविक कार्य आहे. व ते कार्य जर त्याच्या कडुन नीट झाले तर आणि तरच या सृष्टीचे संतुलन टिकुन राहिल. यातील काही घटकांचे कार्य बिघडले तर एकुणच सृष्टीच्या चलन-वलनामध्ये खुप मोठे बदल होतील. त्यामुळे सृष्टीच्या चलनवलनासाठी सर्वच्या सर्व घटकांचे असणे व योग्य प्रमाणात असणे खुप महत्वाचे आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली का? १५ लक्ष किंवा त्याही पेक्षा जास्त प्रकारचे सजीव या सृष्टीचे चलनवलनाचे कार्य नीट पार पाडण्यास जबाबदार आहेत. आहे ना आश्चर्यचकीत करणारी बाब!!
आता यापुढे मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते समजल्यावर तुम्ही आश्चर्याने अक्षरशः तोंडात बोट घालाल. या अफाट अशा पृथ्वीच्या एकंदरीत संचालनासाठी १५ लाखांपेक्षा जास्त प्रजातींचे सजीव काम करतात. एक ट्रिलियन प्राणीमात्रांचे घर असलेली पृथ्वी नीट पणे सुरळीतपणे सुरु आहे याचे कारण म्हणजे या एक ट्रिलियन प्राणी मात्रांमधील संतुलन. पृथ्वीचा कार्यभार नीटपणे पार पाडण्यासाठी १ ट्रिलियन सजीव कार्यरत असतात. या १ ट्रिलियन सजींवांना मिळुन आपण जीवसृष्टी म्हणतो.
आता गंमत बघा.
आपले शरीर म्हणजे कोणत्याही जिवंत व्यक्तिचे शरीर देखील या पृथ्वीपेक्षा काही कमी नाहीये. आपले पुर्वज अगदी योग्य म्हणी वापरायचे. पिंडी तेच ब्रह्मांडी. किंबहुना आपला पिंड म्हणजे शरीर या ब्रह्मांडापेक्षा खुपच जास्त सजीवांचे घर आहे. आपल्या शरीरामध्ये एकुण 100,000,000,000,000 इतके सजीव वास्तव्यास असतात.. हे सजीव सुक्ष्म असतात. म्हणुनच आपण याला सुक्ष्मजीवसृष्टी म्हणुयात. बघा पृथ्वीवर जी आहे ती जीवसृष्टी आणि आपल्या शरीरामध्ये जी आहे ती म्हणजे सुक्ष्मजीवसृष्टी. यालाच इंग्रजी मध्ये मायक्रोबायोम microbiome असे म्हणतात. वर सांगितल्या प्रमाणे बाह्य जीवसृष्टीमध्ये एक ट्रिलियन जीव आहेत, तर आपल्या शरीर सृष्टीमध्ये किती आहेत?
१०० ट्रिलियन पेक्षा जास्त सुक्ष्मजीव आपल्या शरीरात निवास करुन असतात. आपल्या शरीरातील विविध पेशी साधारणपणे १० ट्रिलियन असतील. म्हणजे सुक्ष्मजीवांचे प्रमाण शरीरातील पेशींपेक्षा ही खुपच जास्त आहे.
आहे की नाही आश्चर्यकारक गोष्ट ही!!
याच १०० ट्रिलियन सुक्ष्मजीवांच्या असण्यामुळे आपण असतो. यांना इंग्रजी मध्ये बॅक्टेरिया असे म्हणतात. हे सुक्ष्मजीव जर आपल्या शरीरास हानिकारक असतील तर त्यांना व्हायरस देखील म्हंटले जाते. जसे हानिकारक सुक्ष्मजीव असतात तसेच मनुष्याच्या आरोग्यासाठी पुरक सुक्ष्मजीव देखील आपल्या शरीरामध्ये असतात. व दोहोंचे योग्य प्रमाण असेल तर आपली प्रकृती चांगली आहे असे खुशाल समजावे! पण हे प्रमाण योग्य किंवा संतुलित आहे किंवा नाही हे कसे समजणार?
तर हे प्रमाण समजणे शक्य नाहीये. उलट शोध घेतला तर समजते की हे प्रमाण योग्य आहे की नाही?
आपल्या शरीरातील सुक्ष्म-अतिसुक्ष्म जीवांचे (उपयोगी व हानिकारक) हे प्रमाण/संतुलन जर बिघडले तर काय होऊ शकते?
आपणास वारंवार होणारा सर्दी खोकला, सतत वाढणारे वजन, किंवा अचानक कमी होणारे वजन. डोकेदुखी , ताप इत्यादींचा या सुक्ष्म-अतिसुक्ष्म जीवसृष्टीशी काही संबंध आहे का?
हे जाणुन घेण्यासाठी आवर्जुन वाचा आमचा पुढील आठवड्यातील या लेखाचा पुढचा भाग!
आपले निरामय आरोग्याचे सांगाती
महेश व पल्लवी ठोंबरे
9923062525