Stay Fit Pune - The weight loss center

Diet for diabetes Pune

मधुमेह आजार की सुवर्णसंधी?

माझ्या मागील,मधुमेहाविषयीच्या तीन विस्तृत लेखांमधुन आपण, मधुमेह म्हणजे नक्की काय? त्याचे प्रकार किती व कसे आहेत? जीवनशैलीचा मधुमेहावर होणारा तसेच मधुमेहाचा जीवनशैलीवर होणारा परीणाम काय आहे? प्रकार दोनचा मधुमेह होऊ नये म्हणुन कोणती काळजी घ्यावी? अशा अनेक प्रश्नांविषयी खोलात जाऊन चर्चा केली.

दरम्यान मला अनेक मित्रांनी फोन कॉल, मेसेज आणि व्हॉट्सॲप द्वारे एक प्रश्न विचारला. तो असा.

मधुमेह असलेल्या व्यक्तिने आहार कसा घ्यायला हवा?

हा प्रश्न खुप महत्वाचा आहे. त्यातल्या त्यात, मधुमेह असणा-या व्यक्तिस आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मागील लेखामध्ये आपण पाहिले की मधुमेहाला इलाज नाहीये. एकदा का मधुमेह जडला की त्याची संगत आयुष्यभर राहते. खरतर मधुमेह हा एक धोका आहे. पण अधिक विचार केला तर आपल्याला समजेल की मधुमेह एक सुवर्णसंधी देखील आहे. मधुमेह सुवर्ण संधी कसा काय होऊ शकतो? चला तर मग आपण समजुन घेण्याचा प्रयत्न करुयात मधुमेहातील सुवर्णसंधी म्हणजे नेमके काय?

हा लेख वाचण्यापुर्वी दोन गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे. पहिली म्हणजे महेश ठोंबरे किंवा पल्लवी ठोंबरे डायटीशीयन नाहीत. याच अर्थ असा आहे की आम्ही फक्त सामान्य माहिती व अनुभव सांगु शकतो तुम्हाला पण मधुमेहाच्या रुग्णाला वैयक्तिक आहार मार्गदर्शनाची गरज असते व ही गरज व्यक्तिपरत्वे बदलते. मधुमेह कोणत्या प्रकारचा आहे? रुग्णास दिवसभरात काम करण्यासाठी किती ऊर्जा लागते? त्याचे वेळापत्रक काय आहे? कामाचे स्वरुप काय आहे? आजार किती जुना आहे? रुग्णाचे वय किती आहे? अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारावर मधुमेह असणा-या व्यक्तिला आहार सुचवला जाऊ शकतो. व हे काम एखाद्या प्रमाणित फिजीशीयनकडुन एकदा तरी करुन घ्यावेच. व दुसरी गोष्ट अशी की हा लेख मधुमेहावर इलाज सुचवत नाही. तर मधुमेहाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न आपण या लेखातुन करणार आहोत.

आपण आधीच्या लेखांमध्ये पाहीले आहेच की मधुमेह कोणास होऊ शकतो. ज्या व्यक्ति  प्रकार दोनचा मधुमेह होण्याची शक्यता अशा व्यक्तिस जास्त असते जी व्यक्ति स्वःतच्या आरोग्याच्या बाबतीत मुळातच उदासिन असते. करीयर,नोकरी, घर संसांर या सगळ्यामध्ये या लोकांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो. वेळी अवेळी खाणे, रात्री उशिरापर्यंतच्या दारु पार्ट्या, पुरेशी झोप न मिळणे, संतुलित आहार न मिळणे या सगळ्यांचा एकत्रित परिपाक म्हणजे मधुमेह. मधुमेहाची घंटा वाजली रे वाजली आपण घाबरुन जातो. खरतर घाबरुन गांगरुन जाण्याऐवजी मधुमेहाचा उपयोग, आपण आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी, चांगली जीवनशैली आपल्या दररोजच्या जगण्यात आणण्यासाठी आपण करुन घेतला पाहीजे. वैद्यकीय प्रगत तंत्रामुळे, संशोधनामुळे किमान आज आपणास ही धोक्याची पुर्वसुचना मिळते. जर या सगळ्या रक्त तपासण्या वगैरे नसत्या तर आपणास समजलेच नसते की आपणास मधुमेहासारखा काही गंभीर आजार झालेला आहे.

तर अशा व्यक्ति ज्या आजपर्यंत स्वतःच्या आरोग्याविषयी निष्काळजी होत्या, त्या व्यक्तिंना मधुमेह झाला असल्याचे समजल्यावर खरतर आयुष्य नव्याने अंतर्बाह्य बदलण्याची एक संधीच मिळते. मधुमेहाला इलाज जरी नसला तरी, मधुमेहा सहीत आपण खुप चांगले आयुष्य जगु शकतो, आपल्या जीवनशैलीमध्ये आमुलाग्र बदल आपण आणु शकतो. बघा… आहे ना मधुमेह एक संधी!!!

नुसता आहारात बदल करुन मधुमेह सुखकर करता येईल का? नुसत औषधे गोळ्या घेतल्याने मधुमेह सुखकर होईल का? तर नाही. मधुमेहाला आपला साथीदार बनवुन, आपण आपल्या जीवनामध्येच आमुलाग्र, आंतर्बाह्य बदल घडवले पाहीजेत. मधुमेहाला साजेसा आहार हा या उन्नत जीवनशैलीचा एक भाग आहे. त्याशिवाय अन्य अनेक गोष्टी आपल्या या उन्नत जीवनशैलीमध्ये असु शकतात.

आता आपण जीवनशैली तील बदल म्हणजे नक्की काय हे समजुन घेण्याचा प्रयत्न करुयात.

 

Lifestyle – म्हणजेच जीवनशैली हा सध्या एक परवलीचा शब्द झालेला आहे. आमच्या क्लब येणा-या अनेक मेंबर्संना सुरुवातीस त्यांचे वजन कमी करावयाचे असते किंवा वाढवायचे असते. आणि त्यांच्या या ध्येयासाठी आम्ही त्यांना मदत करतो देखील. तात्काळ वजन कमी करुन दाखवायची शेकडो उदाहरणे आमच्या कडे आहेत. वजन कमी किंवा जास्त किंवा संतुलित असणे हा जीवनशैलीचा एक भाग आहे. याचा अर्थ असा की तुमची जीवनशैली तुमच्या शरीराच्या वजनातुन व्यकत होत असते. तुमच्या चेह-यावरील ताणतणावातुन तुमची जीवनशैली इतरांना आणि तुम्ही स्वतः पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला स्वतःला देखील दिसते.

जीवनशैली म्हणजे काय तर आपले व्यक्तिगत अस्तित्व की जे आपल्या सामाजिक अस्तित्वावर अवलंबुन असते. समाज शब्दाचा अर्थ इथे संपुण देश वगैरे घ्यायचा नाही. आपल्या नेहमी संपर्कात येणा-या व्यक्ति, घटना, व्यवहार आपण कसे करतो व त्याचा आपल्यावर काय परीणाम होतो यास जीवनशैली असे म्हणता येईल. जीवनशैली या विषयावर लिहिण्यासारखे खुप आहे. या विषयावर एक स्वतंत्र लेखमाला तयार होऊ शकते. व पुढ्च्या काळात मी अशी लेखमाला लिहिणार देखील आहे.

तात्पुरते आपण उन्नत जीवनशैलीची काही लक्षणे पाहुयात.

lifestyle @ StayfitPune.com

 • भयमुक्त असणे

 • प्रफुल्लित असणे

 • सदैव तत्पर असणे

 • वरील तीनही गोष्टी इतरांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे

उन्नत जीवनशैलीची ही चतुःसुत्री आहे. याविषयी सविस्तर मी भविष्यात लिहिणार आहेच.

मग या जीवनशैलीमध्ये मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहार विषयक काही ढोबळ मार्गदर्शक तत्वे आहेत की नाहीत? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. त्याविषयी आपण आता समजुन घेऊयात. आपण जी जीवनशैली आजतागायत जगलो नाही ती जगण्यासाठी आणि मधुमेह सुखकर होण्यासाठी आपल्या आहारात देखील काही ढोबळ मानाने बदल करणे गरजेचे आहे.

शास्त्रीय भाषेत सांगायचे झाले तर मधुमेहाच्या रुग्णाच्या आहारात कोणती पोषकतत्वे किती प्रमाणात असावीत हे थोडक्यात बघु

प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांचे योग्य प्रमाण:
प्रथिने 10% to 15%
कर्बोदके 55% to 60%
स्निग्ध पदार्थ 25% किंवा त्यापेक्षा कमी

 

प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ अशा शब्दातुन सामान्य माणसाला फार काही समजत नाही. त्यामुळे पुढे मी प्रत्यक्ष कोणते पदार्थ, भाज्या, धान्य कडधान्य खाव्यात किंवा खाऊ नयेत याविषयी सविस्तर लिहितो.

सुरुवातीस आपण काय गोष्टी टाळाव्यात हे पाहुयात.

weight loss program in Pune

हे टाळा…

 1. गूळ किंवा साखर (अगदी मध सुद्धा) घातलेले सर्व पदार्थ बंद
 2. कोकाकोला, पेप्सी, मिरिंडा, मॅंगोला, लिम्का यांसारखे सर्व कोल्ड्रिंक्स बंद करा.
 3. तळलेले सर्व पदार्थ बंद करा.
 4. सर्व बेक केलेले पदार्थ बंद करा.
 5. साबुदाणा, मैदा,रवा, खवा (मावा) यांपासून बनविलेले सर्व पदार्थ बंद
 6. पांढरा भात, बटाटा, रताळे कमी प्रमाणात कमी वेळा खा.
 7. पिकलेले आंबे, चिकू, केळी अतिशय कमी प्रमाणात खा किंवा अजिबात खाऊ नका. (दिवसातून जास्तीत जास्त २५- २५ ग्राम दोन वेळा-एकूण ५० ग्राम.)

मधुमेह असणा-या व्यक्तिंनी काय खावे

weight loss program in Pune

 1. इडली, उपमा, डोसा इत्यादी (विविध डाळी, धान्य जसे बाजरी, गहु, ज्वारी,इत्यादींच्या पीठाचा डोसा )
 2. लापशी, खीर (साखर बेताची असावी),
 3. थालीपीठ, पराठा
 4. भाजके चणे, शेंगदाणे (कच्चे असल्यास उत्तम), चिक्की
 5. ओल्या शेंगा (भुईमूग), हिरवा वाटाणा, मक्याचे कणीस
 6. काकडी, सफरचंद, केळी, कलिंगड इत्यादी
 7. नेहमीचे घरगुती जेवणाचे पदार्थ: चपाती, भाकरी, पिठले, डाळ, दही इत्यादी
 8. जास्त चोथायुक्त पदार्थ (फायबर युक्त खाद्यान्न)
 9. डाळी / कडधान्यं: छोले, वाटाणे, हरभरे, डाळ, उसळ इ.
 10. मोड आलेली कडधान्यं (मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.)
 11. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, टोमॅटो, काकडी, कांदा, कोबी
 12. पपई, पेरू, बोरे, कलिंगड, नाशपाती(पीयर), सफरचंद, डाळिंब यांसारखी फळे
 13. आख्खी कडधान्ये- उदा. मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.
 14. कुरमुरे, भाजलेले चणे, मक्याचे कणीस, ओला हिरवा मटार इ.
 15. गहू, बाजरी, ज्वारी यांच्या पिठांच्या पोळ्या/भाकऱ्या
 16. पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या मिश्रपिठांच्या भाकऱ्या
 17. पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या रव्याची खीर किंवा उपमा
 18. व्होल व्हीट ब्रेड पासून बनवलेले व्हेज सॅंडविच

घरामध्ये स्वयंपाक करताना काय काळजी घ्यायची

 • फोडणीसाठी तेल अल्प प्रमाणात वापरावे
 • जेवणात कच्च्या भाज्या, टोमॅटो, काकडी, कांदा, कोबी + दही यांपासून कोशिंबीर/सॅलॅड तयार करून त्याचा जेवणात मुबलक प्रमाणात वापर करावा
 • गोड खायची इच्छा झाल्यास (उदा. हापूस आंबा) पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या मिश्रपिठांच्या भाकऱ्या यासोबत थोडासा खायला द्या, नुसता आंबा नको.
 • दोन किंवा तीन वेळा भरपूर जेवण्यापेक्षा पाच किंवा सहा वेळा थोडे थोडे जेवायला द्या.
 • दोन किंवा तीन वेळा भरपूर जेवण्यापेक्षा पाच किंवा सहा वेळा थोडे थोडे जेवायला द्या.
 • पाच किंवा सहा वेळा थोडे थोडे जेवायला देणे शक्य नसेल तर तीन वेळा रेग्युलर जेवण आणि दोन वेळा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/पोहे इ.) द्या. डोसा आणि उपमा कमीत कमी तेल वापरून बनवा.
 • नाश्त्यामध्ये सामोसा, वडापाव, भजी, पुरी-भाजी, शिरा, साबुदाणा-वडा, मिसळ-पाव यांसारखे पदार्थ टाळा.
 • चहा-नाश्त्यामध्ये फरसाण, बिस्किटे, खारी, केक, साबुदाणा खिचडी, शंकरपाळी, बाकरवडी यांसारखे तळलेले किंवा बेक केलेले व मैद्याचे पदार्थ टाळा.
 • शुगर फ्री उत्पादने देखील टाळावीत. या उत्पादनांचे साइडैफेक्टस जास्त असतात की ज्याचा आपल्या चयापचयावर विपरीत परीणाम होतो.

आहाराबाबत वर दिलेल्या सुचना मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी महत्वाच्या आहेतच. त्याव्यतिरिक्त, ज्यांना मधुमेह नाहीये, त्यांनी देखील आहारामध्ये असा बदल केला तर, तो बदल म्हणजे जीवनशैली बदलासाठी टाकलेले पहिले पाऊल असेल.

चला तर मग, मधुमेहाला आपला सोबती बनवुन, एक संधी मानुन आपले आयुष्य आंतर्बाह्य बदलुयात व उन्नत जीवनशैलीचा अंगीकार करुयात.

तुम्हाला वरील विषयासंबंधात कसलीही शंका असेल तर, अवश्य आमच्या शी संपर्क करा.

कळावे

 

महेश ठोंबरे – 9923062525

पल्लवी ठोंबरे – 9765702525

Facebook Comments

Comments
 • reply
  Rahul Thombare
  May 11, 2018

  Article was too good and so informative.

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.