जीवनाचे सार, जीवनाचे रहस्य, जीवनाचे अस्तित्व , जीवनाचे मर्म, जीवनाचे कर्म, जीवनाचे धर्म, जीवनाचे वर्म जीवनाचे रंग, जीवनाचे बेरंग या विषयी मराठी साहित्य खच्चुन भरले आहे. त्यातही एक महान कवी गोविंद त्र्यंबक दरेकर म्हणजेच गोंविंद कवी यांनी लिहिलेली एक कविता मला आज सहज आठवली. ही कविता मी पुलंनी लिहिलेल्या एका नाटकात ऐकली होती. त्यान नाटकात आज दिवंगत झालेले नटवर्य श्रीराम लागुंनी देखील काम केले आहे. आणि त्यांच्या जाण्याची बातमीच निमित्त ठरली मला या कवितेच्या ओळी आठवायला. पुलंनी लिहिलेले ते नाटक म्हणजे “सुंदर मी होणार” आणि गोविंदकविंची ती कविता म्हणजेच ‘सुंदर मी होणार’
नाटक इतके भन्नाट आहे की ते पुनःपुन्हा पहावेसे वाटते. मानवी भाव-भावनांना शब्दंत पटकथेत पुलंनी इतके हळुवार गुंफले आहे की, याची तुलनाच होऊ शकत नाही.
या नाटकाने व अश्या अनेक पुस्तकांनी मला देखील अनेकदा अंतर्मुख केले आहे. पुस्तकांतीलच विचार मला माझे वाटतात असे नाही. व कोणत्याही लेखकाचा असा हेतु देखील नसावा, नसतोच. लेखक त्याला आलेल्या अनुभूतींची अभिव्यक्ति मात्र करीत असतो त्याच्या लिखाणातुन. लेखकाच्या जाणिवा इतक्या समृध्द झालेल्या असतात की त्यांमध्ये त्याच्या भाव-भावनांच्या अमर्याद महासागरात सुख-दुखाची एखादी छोटीशी टाचणी जरी पडली तरी तिचा आवाज लेखकाच्या अंतर्मनाचा आसमंत भारुन टाकतो. त्या आवाजाने भारलेला तो आसमंत अगदी मग पुन्हा त्याच भाव-भावनांची नव्याने ओळख करुन देत असतो. मला जसे जमेल तसे मी देखील लिखाणाचा प्रयत्न करीत असतो. माझे वाचन त्या मानाने अगदी कमी आहे. पण मी जे काही वाचले किंवा पाहिले (नाटक , सिनेमा) ते सारेच दर्जेदार आहे. पुल किंवा गोंविंदकवि किंवा श्रीराम लागु सारख्या लोकांनी नुसतेच त्यांचेच जीवन समृध्द केले होते असे नाही तर हजारो लाखो लोकांना देखील जीवनाकडे पाहण्याचा नवनवीन दृष्टिकोन त्यांनी दिला. व त्याच अनेक लोकांतील मी एक सामान्य मनुष्य.
या नाटकाने वा साहित्याने आपले सा-यांचेच जीवन समृध्द झाले आहे. विचारांचे तरंग मनात उठतात कशामुळे व ते कशापद्धतीने शांत असलेल्या मनः सागराच्या तळाला देखील ढवळुन काढतात, कसे ते तरंग या सागराच्या पृष्टभागावर तरंगणा-या सा-या छोट्या मोठ्या स्मृतींना हलवुन सोडतात , व कसे हळु हळु तेच तरंग पुनः सागराशी एकरुप होऊन निवतात व पुनः हा मनःसागर शांततेचा अनुभव करतो हे सारे मराठी साहित्यातुन आपणास समजते. आपले साहित्य इतके समृध्द आहे की त्यास तोडच नाही.
कधी कधी मला असे ही वाटते की आपले जीवन जणु एक नौका आहे. ही नौका बनलेली आहे शरीररुपी लाकडाने. मनरुपी नाविक ही नौका वल्हवतो, त्याला सुकाणु असतो अंतरीच्या शुध्दस्वरुपाचा व वल्हे असतात प्रेरणा, इन्स्पिरेशनचे. ज्यांच्या नौकेलाच छिद्र पडतात त्यांची नौका जलसमाधी घेणारच व ज्यांच सुकाणु देखील चुकीचा आहे वा वल्हे देखील स्वार्थ वा परनिंदा, द्वेष मत्सर क्रोध यांचे असतात ते देखील इप्सित स्थळी कधीच पोहोचु शकणार नाहीत. परिणामी त्यांची नाव देखील न कोत्या ठिकाणी शक्तीव्यय झाल्याने बुडणारच. नाव सर्वांचीच बुडणार जरी असली तरी तिने आपणास गंतव्यास पोहोचवले की नाही पोहोचवले यावर ठरते आपले जीवन म्हणजे आपली नौका कृतार्थ झाली की नाही ते.
श्रीराम लागुंच्या जाण्याने सहज सुचलेले हे विचार तसे पाहता आरोग्याशी सरळ सरळ जोडलेले नाहीत. पण हेच ते विचार आहेत की ज्यामुळे आपण आपले जीवन सर्वार्थाने निरामय करु शकतो. ख-या अर्थाने सुंदर मी होणार आणि माझे जीवन देखील मी सुंदरच बनविणार, अशा प्रकारची प्रेरणा पुल, लागु, गोविंदकवी यांसारख्यांमुळे आपणास अशीच मिलत राहो. या लोकोत्तर व्यक्तित्वांची उणिव देखील भरुन निघो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
माझ्यावर ज्या नाटकाचा व ज्या कवितेचा प्रभाव जबरदस्त झालाय ते दोन्ही आज तुमच्या साठी इथेच उपलब्ध करुन देत आहे. लेखाच्या खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला नाटक व कविता दोन्ही मिळतील.
Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below.
जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार नव्या तनूचे, नव्या शक्तिचे पंख मला फुटणार सुंदर मी होणार, सुंदर मी होणार – मृत्यू म्हणजे वसंत माझा, मजवरती फुलणार सौंदर्याचा ब्रह्मा तो मज सौंदर्ये घडणार सौंदर्ये घडणार, सौंदर्ये घडणार
गोविंदकवींची ती पुर्ण कविता वाचण्यासाठी कृपया इथे क्लिक करा