
कोरोना-१९ भयानक आहे पण मनुष्य देखील पुर्वीपेक्षा जास्त तयारीत आहे…
नमस्कार मंडळी
आज माणसाच्या आधुनिकतेची एका अर्थाने परिक्षाच आहे. या आधुनिकतेने मनुष्यास स्पर्धक बनविले आहे, मनाची शांती नाहीशी केली आहे, व्यक्तिव्यक्तिंमध्ये दुरावे निर्माण होत आहेत, निसर्गाशी असलेली नाळ तुटत आहे; अशा एक ना अनेक गोष्टी आधुनिकतेमुळे आपणास मिळाल्या आहेत, की ज्या नक्कीच अयोग्य आहेत. पण अजुन एक गोष्ट या आधुनिकतेमुळे आपणास मिळाली आहे, ती म्हणजे तंत्रज्ञान. व याच तंत्रज्ञानाच्या जोरावर आज हा आधुनिक मनुष्य कोरोना विषाणु जन्य कोविड-१९ या जीवघेण्या महामारीशी लढा देत आहे, व तोही खुपच जास्त परिणामकारक अशा पध्दतीने.
जसजशी मानवी संस्कृतीचा विकास होत गेला तस तसे संसर्गजन्य रोगांचा देखील विकास होत गेलेला आहे हे आपला इतिहास सांगतो आहे. कमी भुभागात, गर्दी करुन राहणारे, अपुरे पोषण मिळणारी लोकसंख्या नवनवीन विषाणु व विषाणु जन्य आजारांसाठी एक सुफलाम भुमिच होय. आणि त्यातच विश्व व्यापार संबंधामुळे, व्यापारी आवकजावक, देवाण घेवाण यामुळे एका भुभागातील आजार, दुस-या भुभागात पसरले जाऊ लागले.
मानवाच्या लिखित ज्ञात वैद्यकिय इतिहासातील सर्वात भयावह अशी रोगराई पसरली गेली होती इसवीसना पुर्वी अंदाजे ६०० वर्षापुर्वी. येर्सिनिया पेस्टीस असे शास्त्रीय नाव असलेल्या विषाणु पासुन होणा-या या आजारास पुर्वीपासुनच आपण प्लेग म्हणत आलो आहोत. युरोपातील बायझॅंटीन साम्राज्यात सुरुवात झालेल्या या महामारीने अख्ख्या जगाला कवेत घेतले. त्या काळी जगाच्या एकुण लोकसंख्येपैकी किमान ५०% लोक या साथीच्या रोगात मरण पावले असल्याचे अंदाज काढले गेले आहेत. त्या काळात हा आजार वणवा पसरावा तसा पसरला.
आजारी असलेल्या माणसांपासुन लांब राहण्यापेक्षा आणखी कसलाही इलाज किंवा निदान त्या काळातील लोकांना नव्हते असे ही अभ्यासक सांगतात. जेवढे जेवढे मरु शकतात, ज्यांच्या ज्यांच्या मध्ये प्रतिकार शक्ति कमी होती, असे सगळे मृत्युमुखी पडले.
असाच आणखी एक साथीचा आजार युरोपात चौदाव्या शतकात आला होता. हा साथीचा आजार ब्लॅक डेथ नावाने ओळखला गेला. यामध्ये एकट्या युरोपात वीस कोटीपेक्षा जास्त लोक दगावल्याचे अभ्यासक सांगतात. याच काळात क्वारांटाईन म्हणजे विलगीकरणाची पद्धत वापरली गेल्याचे पुरावे आढळतात. बंदरावर आलेल्या दर्यावर्दींना विभक्त ठेवण्यात येत होते, जो पर्यंत ते आजारी नाहीत असे सिध्द होत नाही. व एकदा ते सर्वसामान्य आहेत असे समजले तरच त्यांना शहरात प्रवेश दिला जात होता. अजुनही युरोपातील मनुष्यास याचे शास्त्रीय, वैद्यकीय कारण काय असावे याचा अंदाज आलेला नव्हता. सुरुवातीस ते तीस दिवस माणसांना जहाजामध्येच विभक्त ठेवीत व तीस दिवस असल्यामुळे यास ट्रेंटीनो असे म्हंटले गेले व तसा कायदा देखील बनवला गेला. पुढे जाऊन तीस दिवसांच्या ऐवजी चाळीस दिवस अलगीकरण करण्याचा कायदा आला. चाळीस-चार म्हणुन यास क्वारंटिनो असे म्हंटले गेले.

ब्लॅक डेथ महारोग
यानंतर सलग तीनशे वर्षे लंडन साथीच्या रोगाने ग्रासलेले होते. या तीनशे वर्षांत एकुण ४० साथीचे महा भयानक आजार लंडन मध्ये आले व प्रत्येक वेळी त्याने लंडन च्या लोकसंख्येपैकी २०% लोकांस यमसदनी धाडले. सन १५०० मध्ये इंग्लंड ने विभक्तीकरण व उपचार असा पहिला कायदा बनवुन, रोग्यांना सामान्य माणसांपासुन दुर ठेवले. याच साथीच्या रोगात जर एखाद्या घरात रोगी असेल तर त्या घराबाहेर विशिष्ट खुण केली जायची जेणेकरुन संसर्गित घर सर्वांस समजावे. सोबतच त्या घरातील कुणी जर बाजारात जात असेल तर त्या व्यक्तिने विशिष्ट रंग काठी किंवा दंड हातात घेऊनच बाहेर पडावे अशी पायंडा पडला होता. हा आजार मांजरे व कुत्र्यांच्या द्वारे पसरला जातो अशा अफवेमुळे लक्षावधी प्राण्यांच्या सामुहिक कत्तली केल्या गेल्याचे ही दाखले आहेत.
सन १६६५ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीने एकट्या लंडन मधील एक लक्ष लोकांस मारले. या साथीला आळा घालण्यासाठी रोगग्रस्तांना त्यांच्याच घरात डांबुन ठेवण्यात आले. मेलेल्यांना गाडण्यात आले. लंडन अक्षरशः मृत्युचे मैदान बनले होते. कदाचित प्लेगची ही शेवटचीच साथ ठरली.
अठराव्या व अकोणिसाव्या शतकात जगाला आणखी एका भयानक साथीच्या रोगाने ग्रासले. त्याचे नाव होते स्मॉलपॉक्स. या आजाराचे उगम स्थान देखील युरोपच भले. पण याने ग्रासले मात्र संपुर्ण जगाला. युरोपातुन भारतात आलेल्या ब्रिटीशांसोबत हा रोग भारतात देखील आला व आपण यास देवीचा रोग म्हणु लागलो. भारतीयांना हा आजार माहित नव्हता अशातला भाग नाही. पण भारतीयांना या आजारापासुन बचाव कसा करायचा हे नुसते माहितच नव्हते तर त्यांनी यावर प्रतिबंधात्मक औषध/लस देखील बनवुन तिचा उपयोग केला होता याचे दाखले चीनी औषध साहित्यामध्ये आढळतात. भारतात याला टीका देणे म्हणायचे व ही पध्दत चीनी राजघराण्यांमध्ये अनेक शतके वापरली गेल्याचे आढळते. युरोपात या आजाराने दर दहा पैकी तीन माणसे मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे. मेक्सिकोची लोकसंख्या ११ कोटींवरुन १ कोटीवर आली ते देखील याच साथीच्या आजाराने. सतराव्या शतकात जेव्हा युरोपात या आजाराने थैमान घातले होते तेव्हा देखील भारतात टिका देण्याची पध्दती वापरली जात असल्याचे अभ्यासक धरमपाल (गांधीजींचे निकटवर्ती) यांनी त्यांच्या द ब्युटीफुल ट्री या पुस्तकात लिहिले आहे. असो.
स्मॉलपॉक्स हाच तो पहिला आजार आहे की ज्याच्या साठी आधुनिक वैद्यक शास्त्राने देखील लस देऊन प्रतिबंध करण्यावर जोर दिला. आणि हा प्रयोग यशस्वी देखील झाला.
पुन्हा एकदा एकोणिसव्या शतकाच्या मध्यात इंग्लंड ला ग्रासले ते कॉलेरा या महाभयानक साथीच्या आजाराने. या आजारात लाखाच्या आसपास इंग्लंडवासी मृत्युमुखी पडले. संसर्ग झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांत रोगी मृत्युमुखी पडायचा. पण हा संसर्ग पिण्याच्या पाण्यातुन होतो आहे हे समजायला खुप वेळ लागला. तोपर्यंत बरेच नुकसान झालेले होते. जेव्हा याचे मुळ समजले तेव्हा पिण्याच्या पाण्याचे बोरवेल्स व विहिरी, नद्यांवर पाणी भरण्यास वापरण्यास बंदी घालण्यात आली व त्याने काही महिन्यांतच हा रोग आवाक्यात आला.
मित्रांनो, साथीच्या आजारांनी मानवी जीवनांस अनेकदा ग्रासले होते. करोडोंच्या संख्येत लोकसंख्या त्या त्या काळात कमी झाली. घरेच्या घरे, गावेच्या गावे, देशच्या देश उध्द्वस्त झाले होते. तरीही प्रत्येक वेळी त्या त्या साथीच्या आजारावर आपण म्हणजे मनुष्याने निकराने प्रयत्न करुन विजय मिळविल्याचे आपणास दिसते. मी वर दिलेले केवळ पाचच साथीच्या आजाराचे दाखले आहेत की ज्यांनी खुप मोठ्या प्रमाणात मनुष्य जीवीत हानी केली आहे.
पुर्वी पेक्षा आजचा काळ खुपच जास्त प्रगत आहे. आधुनिकतेने आपणास दिलेले तंत्रज्ञानामुळे आपण कधी नव्हतो तितके जास्त तयार आहोत अशा नवनवीन विषाणु जन्य आजारांशी दोन हात करण्यासाठी. शास्त्रज्ञ मनुष्य जीवन अधिक सुखकर म्हणजेच व्याधीमुक्त कसे होईल यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. सोबतच माहिती तंत्रज्ञानामुळे एखादा विषाणु, एका खंडांतुन दुस-या खंडात, एका देशातुन दुस-या देशात, एका शहरातुन दुस-या शहरत पोहोचण्या आधीच त्या विषाणुची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचत आहे. हे आधुनिकतेमुळे शक्य झाले आहे.
आता आपणास माहित आहे की साथीचे आजार कितपत भयंकर रुप धारण करु शकतात. हा आजार (कोविड-१९) आपणास होऊ नये म्हणुन तातडीचे म्हणुन जे काही उपाय सांगितले आहेत ते आपण सर्वांनी अजिबात कानाडोळा न करता पाळले पाहिजेत. व आपण तसे केले तर आणि तरच आपण कोरोनावायरस जनित या महाभयंकर आजाराला थांबवु शकतो त्यावर विजय मिळवु शकतो.
चला तर मग मित्रांनो पुढील काही गोष्टींची काळजी घेऊयात.
- शासकिय सुचनांचे तंतोतंत पालन करणे
- जमाव न करणे
- घरातुन बाहेर कमीत कमी किंवा अजिबात न पडणे
- स्वच्छतेच्या आधी मिळालेल्या सर्व सुचनांए पालन जसे हात धुणे, खोकला, शिंक आल्यावर रुमाल वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सामान्य सर्दी खोकल्याकडे देखील दुर्लक्ष न करणे
- आपण कुठेही या विषाणुचे प्रवाहक होऊ नये म्हणुन बाहेर गावी प्रवास टाळणे.
- वेळोवेळी येणा-या शासकिय सुचनांकडे लक्ष ठेवणे
आपला देश, आपले अस्तित्व टिकवुन ठेवण्यासाठीचा हा लढा आहे. दिसतो तितका तो सोपा नक्कीच नाही. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
कळावे
Mahesh and Pallavi Thombare
Fitness coaches from Pune.
Author of this FACT-CHECK is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below.
Pingback: उभा देश झाला आता एक बंदीशाळा... - Dreamers to Achievers