Stay Fit Pune - The weight loss center

अर्ध्यावर डाव सोडु नका – तुमच्या माणसांना तुमची गरज आहे!

सुजितचे (नाव बदलले आहे) वय जेमतेम २६ वर्षे असेल. त्याला एका मल्टीनॅशनल कंपनी मध्ये चांगली मोठ्या पगाराची नोकरी होती. साधारण दीड वर्षापुर्वीच लग्न होऊन त्याला एक गोंडस बाळ देखील झाले. आई वडीलांच्या डोळ्याचे पारणे फिटले अक्षरशः सुजितच्या सुखी संसाराकडे पाहुन. सुजितच्या नोकरीमुळे व तो नोकरीत कायम झाल्यामुळे वडीलांनी लवकर रीटायरमेंट घेतली व नातवंडाला खेळवण्यात स्वतःचा वेळ घालवु लागले. अगदी दृष्ट लागावी असेच सारे सुरु होते.

आणि दृष्ट लागलीच! अचानक सुजितला हृद्य विकाराचा तीव्र झटका आला व त्यातच तो गतप्राण झाला. अगदी काही मिनिटांतच सगळा खेळ उरकला. आई-वडील, पत्नी, बहिण, नातेवाईक सगळेच अगदी निशब्द झाले. संसार फुलवायच्या दिवसांत सुजित अर्ध्यावर डाव टाकुन, निघुन गेला. आपणा सारख्या ति-हाईतास जेव्हा प्रसंग समजतो तेव्हा आपली ही हळहळ झाल्यावाचुन राहत नाही, तर विचार करा काय वाटले असेल त्या मायबापास? त्या पत्नीस? बहिणीस?

सुजितला मी व्यक्तिशः ओळखत होतो. कमी उंची, मजबुत बांधा, अगदी दुहेरी हाडाचा म्हंटला तरी चालेल इतका तो गोलमटोल होता. देखील थोडा स्थुल लहानपणापासुनच होता. तो शाळेत असल्यापासुन मी त्याला ओळखत होतो. पुढे उच्च शिक्षण, नोकरी मिळवण्याचा काळ देखील तो माझ्या संपर्कात होता. आणि पुढे अनेक वर्षे आमचा संपर्क झालाच नाही. एकदा सोशल मीडीयावर त्याच्या फोटो सहीत त्याच्या मृत्युची बातमी वाचली आणि सुन्नच झालो.

आज अचानक मला त्याची आठवण यायचे कारण म्हणजे आज मी कोलेस्टेरॉल या विषयावर लेख लिहायला घेतला. विषयास जशी सुरुवात केली तसे मला सुजित आठवला. आणि आज पुन्हा एकदा सुन्न झालो.

सुजितनंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा जणु डोंगरच कोसळला. सुजितच्या दशक्रियेच्या दिवशीच त्याच्या वडीलांना देखील हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी प्राण सोडले. मुलाचा फुलणारा संसार स्वःतच्या डोळ्यांनी पाहवला नाही आणि त्यांनी तोच मार्ग स्वीकारला.

सुजित च्या आयुष्यात सर्व काही ठिक ठाक असताना असे कसे काय झाले? आणि मित्रांनो सुजित हे केवळ एकच उदाहरण आहे. आपल्या अवतीभोवती अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यामध्ये अगदी तरुण मुले, मुली देखील अशा प्रकारे अर्ध्यावर डाव सोडुन निघुन जाताहेत. आणि वयस्क, ज्येष्ठांमध्ये तर या पध्दतीने मृत्युला पावण्याचे प्रमाण तर खुपच जास्त आहे.

काय आहे नक्की हे कारण? चला तर मग आपण प्रयत्न करुयात हे जाणुन घेण्याचा.

हृद्यविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण असते आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे. कोलेस्टेरॉल देखील तीन प्रकारचे असतात. एक प्रकार आपल्या आरोग्यासाठी गरजेचा असतो तर दुसरा व तिसरा प्रकार जास्त झाला तर ते अपायकारक ठरतात. आपल्या शरीरात नियमित पणे कोलेस्टेरॉलची निर्मिती होतच असते व ती व्हावी देखील. पण ती इतकी जास्त होऊ नये की त्यामुळे रक्त वाहिण्यांमध्ये मेण/काजळी सदृश्य अडसर निर्माण करते.

तुम्ही नळाला पाईप लावला व नळ फुल्ल प्रेशर ने सुरु केला तर पाईपच्या दुस-या टोकातुन पाणी खुप जास्त वेगाने व ताकतीने वाहु लागेल. तोच पाईप जर मध्येच मुडपला व पाण्याचा प्रवाह थांबला तर काय होते? तर नळापासुन पाईप निघुन येतो. बरोबर ना?

अगदी याच धर्तीवर रक्तवाहिण्या व हृद्य काम करते. हृद्य म्हणजे तो नळ की सतत रक्त पुरवठा करीत असतो व रक्त वाहिण्या म्हणजे पाईप ज्यामधुन रक्त व रक्तासोबतच इतर घटक देखील वाहुन नेले जातात. याच ‘इतर’ घटकांमध्ये खरतर अनेक घटक असतात. त्यातीलच तीन घटक असतात कोलेस्टेरॉल. तीन प्रकारच्या कोलेस्टेरॉल पैकी पहिला प्रकार आपल्या आरोग्यासाठी गरजेचा असतो तर दुसरा व तिसरा प्रकार देखील आवश्यक असतोच. पण जर त्याची निर्मिती जर गरजेपेक्षा जास्त झाली तर मात्र ते कोलेस्टेरॉल रक्त वाहिण्यांना आतील बाजुस चिकटण्यास सुरुवात होते. आतुन चिकटल्यामुळे व जर हा आतील थर वाढतच गेला तर साहजिकच रक्त वाहुन नेण्याच्या क्षमतेवर प्रतिकुल परीणाम होऊन कमी रक्त अवयवांपर्यंत पोहोचवले जाईल. सोबतच हृद्यावर जास्त दबाव येईल कारण हृद्य तर रक्त पाठवण्याचे काम करीत असतेच. पण पाठवलेले रक्त रक्त वाहिण्यांमध्ये अडकल्यामुळे, गती मंदावल्यामुळे हृद्यावर दबाव येण्यास सुरुवात होईल. नळ व पाईपचे उदाहरण आठवा.

नेमके हेच आहे हृद्यविकाराच्या झटक्याचे कारण! त्यामुळे हा लेख वाचुन सर्व प्रथम तुम्ही काय केले पाहिजे तर कोलेस्टेरॉल साठी रक्ताची चाचणी करुन घ्यावी. जर तुमचे कोलेस्टेरॉल लेवल नॉर्मल असेल तर छान, नसेल तर तातडीने इलाज सुरु करावा लागेल.

पण एक गोष्ट लक्षात येतेय का मित्रांनो? सुजित तर अगदी ठणठणीत होता ना? त्याचे रोजचे कार्यकलाप व्यवस्थित सुरु होते.आणि अचानक हे असे घडले. पण हे अचानक घडलेले नक्कीच नाही. कोलेस्टेरॉल वाढणे अचानक होत नाही. आपल्या जीवनशैलीतील बिघाडामुळे हे होत असते. याचे तीन मुख्य आयाम आहेत.

  • चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी
  • व्यायामाचा-शारीरीक श्रमाचा अभाव
  • धुम्रपान/प्रदुषण

त्यामुळे आपली कोलेस्टेरॉल लेवल नॉर्मल असली तरीही आपण वरील गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. चरबी व्यतिरीक्त अन्न खाणे सुरु करावे. या प्रकारच्या फॅट्स ला सॅच्युरेटेड फॅट्स म्हणतात. आणि हे फॅट अपायकारक आहे शरीरास. तसेच जास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट, बेकरी पदार्थ, तळीव पदार्थ व प्रक्रिया केलेले पॅक्ड फुड जसे चिप्स, नुडल्स, ई. असे खाणे टाळावे आणि जमले तर बंदच करावे. व्यायामास सुरुवात करावी. धुम्रपान टाळावे, कमी करावे, बंद करावे!

एवढे सगळे करुन देखील आपल्या अन्नातुन आपल्या शरीरात अनावश्यक कोलेस्टेरॉल तयार होतच राहणार कारण आपण जे काही अन्न खातोय ते विषयुक्त आहे. विषारी रसायनांचा वापर करुनच केलेल्या शेतीतुन पिकविलेले विषारी पिकच आपण खात असतो. हे विष शरीरात जात असतेच. आणि आपले शरीर निसर्गतः हे विष बाहेर काढण्याचे काम करते. पण आपल्या शरीराने असे काम करण्यासाठी शरीरास देखील काही विशिष्ट पुरक गोष्टींची गरज असतेच. पुर्वी ही गरज आहारातुन भरुन निघायची. आणि प्रदुषण , रसायन, विषयुक्त शेती आजच्या तुलनेत कमी होती. आजकाल आपणास ही पुरके आहारातुन मिळत नाहीत. असेच एक पुरक आहे बीटा ग्लुकॉन. बीटा ग्लुकॉन हा घटक फायबर च्या रुपात आपण मिळवु शकतो. जेव्हा याचे पचन होते तेव्हा यापासुन आतड्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची जाळी तयार होते व ही जाळी मग आतड्यांतुन विषयुक्त फॅट्स म्हणजेच अपायकारक कोलेस्टेरॉल ला पोटाच अडवते व रक्तसंचार यंत्रणेमध्ये जाऊच देत नाही. अशा पध्दतीने वरील तीन आयामांसोबतच बीटा ग्लुकॉन जर आपण आहारात घेतले तर अपायकारक कोलेस्टेरॉल आपल्या रक्तामध्येच जाणारच नाही व परिणामी हृद्याचे आरोग्य, तसेच रक्तवाहिण्यांचे काम देखील सुरळीत पार पडेल. बर मित्रानो , या बीटा ग्लुकॉन ची किती आवश्यकता असते बरे आपणास दिवसाला? केवळ तीन ग्राम एका दिवसाला. बीटा ग्लुकॉन हे कसलेही औषध नाही. ती आपल्या शरीराची गरज आहे.

आपल्या कुटुंबियांच्या काळजीसाठी, आपल्या स्वतःच्या निरामय आरोग्यासाठी, सुजित व त्याच्य कुटुंबियांवर जी वेळ आली, ती आपल्यावर न येण्यासाठी; आपण या लेखातुन काय शिकणार?

  • आहार-विहार सुधारणे, व्यायामास आरंभ करणे जमेल तसे व व्यसनांपासुन दुर राहणे  शरीराचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढु न देणे
  • आहारात बीटा-ग्लुकॉन ची मात्रा घेणे. बीटा ग्लुकॉन जर तुम्हाला हवे असेल तर अवश्य संपर्क साधा, आमच्याशी!

धन्यवाद

कळावे

Mahesh and Pallavi Thombare

Fitness coaches from Pune.

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyNDY2NSIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE1OTczIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3Vwc3lzdGljLTQyZDcua3hjZG4uY29tXC9fYXNzZXRzXC9mb3Jtc1wvaW1nXC9wcmV2aWV3XC9iYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld19pZCI6IjExXzg3NDc2OSIsInZpZXdfaHRtbF9pZCI6ImNzcEZvcm1TaGVsbF8xMV84NzQ3NjkiLCJjb25uZWN0X2hhc2giOiIzNDFmYzNmNzhmOTQ5ZWYyNDhlMmE0ZDFhNzcwYmZlNSJ9

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.