Stay Fit Pune - The weight loss center

स्त्रीसौंदर्याचा आविष्कार – केशसंभार

स्त्रियांचे केस हा कायमच मानवी समाज जीवनाचा, आकर्षणाचा, जीवनमानाचा, संस्कृतीचा एक अविभाज्य घटक होता व अजुनही आहे.

अगदी प्राचीन काळापासुनच स्त्रियांचे केस व केशसंभार व त्यांची काळजी, केशभुषा या बाबतीत सखोल चिंतन त्या त्या काळातील साहित्यामध्ये दिसते. कालिदास त्याच्या मेघदुतम या विख्यात व अलौकिक अशा महाकाव्यामध्ये मेघाला निरोप सांगताना स्त्रीच्या केसांचे वर्णन करताना म्हणतो

“स्त्रीच्या मोकळ्या केसांचा पसारा असा असतो की त्याला ‘संभार’ म्हणतात. पण तेच केस वेणीत गुंफले तर किती कमी होऊन जातात?”

“येथील (अलकापुरीमधील) स्त्रिया न्हाऊन झाल्यावर आपले केस वाळवायचा संस्कार करण्यासाठी सुगंधित धुपाचा वापर करतात”

कालिदासच्याच बाबतीत आणखी एक कथा सांगितली जाते. या कथेमध्ये कालिदास प्रवासामध्ये असताना एका वृध्देस पाणी मागतो पिण्यासाठी. त्याचा परिचय करुन घेताना कालिदास स्वतःसाठी जी जी संबोधने वापरतो ती ती सर्व संबोधने कोणत्याही व्यक्तिसाठी कशी शोभत नाहीत हे सांगताना कालिदास एकदा म्हणतो मी हट्टी आहे. त्यावर ती स्त्री म्हणते, तु हट्टी कसा काय असशील बरे, या जगात हट्टी तर फक्त दोनच गोष्टी आहेत. एक हाता पायाचे नखे आणि दुसरे म्हणजे केस. दोन्ही ही किती ही कापले तरी पुन्हा वाढतातच. ही कथा मुळातुन वाचण्यासारखी आहे.

कालिदास मेघास अलकापुरी विषयी सांगतो त्यानंतर तो अलकापुरी व मेघ यामधील साम्य अतिशय रम्यपणे सांगतो. अलका व मेघातील साम्य दाखवल्यावर अलकेतील स्त्रियांच्या साज-शृंगाराचं वर्णन येतं. त्यांनी हातात कमलं धारण केली आहेत, केसात कुंदफुलं माळली आहेत, लोध्रफुलांपासून बनवलेली पावडर लावलेली त्यांची मुखं शोभून दिसत आहेत, केसात नवकुरबकांची पुष्पं माळली आहेत. कालिदास येथे अनुविद्ध असा शब्द वापरतो. अनुविद्ध म्हणजे केवळ माळणं नाही तर वेणीत ती टोचून घालणं, बसवणं आहे. कानात शिरीषफुलं आणि केसांतील भागांत नीपफुलं. काय हा साज-शृंगार, हा हा हा.

हेच काय? सिनेमांनी देखील भारतीय समाजमनावर कायमचाच प्रभाव टाकलेला आहे. अगदी जुन्या काळापासुन ते आधुनिक सिनेमापर्यंत, स्त्रीचे केस सिनेमातील आकर्षणाचा विषय आहे. व याचाच परिणाम समाजावर देखील झालेला दिसतो आहे.

जुल्फ घनेरी छांव

ये रेशमी जुल्फे

तेरे जुल्फोंके साये मे

क्या तेरी जुल्फे है

शेकडो गाणी, कवने, कविता, शाय-या सापडतील आपणास स्त्रियांच्या केसांवर लिहिलेली.

पण मैत्रिणींनो, आजकालच्या काळातील बेसुमार अन्न, हवा, जल प्रदुषणाचा परिणाम जसा आपल्या एकंदरीत आरोग्यावर होतो तसाच तो आपल्या केसांवर देखील होतोच.

लांब ,तजेलदार ,काळेभोर केस हे स्त्री सौंदर्याचे आणखी एक लक्षण आहे. लक्ष वेधणारे असे हे लक्षण. क्षणोक्षणी लक्ष देऊन जपावे लागते , जोपासावे लागते.केसांच्या मुळांनी शोषलेली पोषक द्रव्ये व डोक्याच्या कातडीचे आरोग्य यावर केसांचे सौंदर्य अवलंबून असते.

आज आपण जाणुन घेऊयात स्त्रियांमधील केस कमी होण्यामागील मुख्य कारणे.

आपल्या डोक्याच्या त्वचेमधील रंध्रांमधुन केस उगवत असतात आणि महिन्याला अंदाजे अर्धा इंच इतक्या गतीने आपले केस वाढतात. आपला प्रत्येक केस साधारणपणे दोन ते चार वर्षे वाढत राहतो.  त्यानंतर त्याची वाढ थांबते व काही काळाने तो पडतो. केस गळणे ही तस पाहिल तर अगदी नैसर्गिक क्रिया आहे. एखादा केस अशापध्दतीने गळुन पडला की लगलीच त्याच जागी नवीन केस उगवत असतो. स्त्रियांअमध्ये टक्कल पडण्याची क्रिया तेव्हा सुरु होते जेव्हा जुना केस गळतो पण त्या जागी नवीन केस उगवत नाही.

weight gain program in Pune

Kalyani, one of club members

काय बरे कारणे आहे मैत्रिणींनो आपले केस पातळ होण्याची, किंवा गळत राहण्याची. चला आपण पाहुयात.

  • वयोमान
  • हार्मोन्स मधील बदल / मेनोपॉज नंतरचा काळ
  • शरीराला पोषक आहार न मिळणे

या व्यतिरिक्त आणखीही काही कारणे अशी देखील असु शकतात जसे अनुवांशिकता, इतर व्याधींसाठी औषधोपचार, त्वचा-रोग, शरीरामध्ये लोह, विटामिन बी ची कमतरता आणि काही यौन-संसर्गातुन होणारे आजार. पण वरील तीन कारणे जी आहेत ती मुख्य कारणे आहेत.

त्यातील ही वरील दोन कारणे टाळता येऊ शकत नाहीत. पण जर आपण तिस-या कारणावर , अगदी बाल्यावस्था, तारुण्यापासुनच लक्ष दिले तर वयोमान व मेनोपॉज यांच्यामुळे होणा-या परिणामांची तीव्रता बरीच कमी करता येऊ शकते.

योग्य व पोषक आहार, की ज्यात आवश्यक प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स असे सर्व काही मिळेल असा आहार आपण घेतला पाहिजे. याला पुर्ण आहार म्हणतात. हा आहार घेणे हे मुख्य काम मैत्रिणींनो तुम्हाला करावे लागेल जर तुम्हाला तुमच्या केसांचे आरोग्य सांभाळायचे असेल तर. तुमचा आहार नक्की कसा असावा यासाठी तुम्ही माझ्या शी व्यक्तिगत संपर्क करु शकता. मी तुम्हाला घरगुती आहाराच्या बाबतीत योग्य तो सल्ला अगदी मोफत देईल.

त्यासोबतच तुम्हाला काही गोष्टींची वेगळी काळजी घेणे गरजेचे आहे.

  • अशा हेयरस्टाईल्स टाळा की ज्यामुळे केसांवर ताण येतो
  • उष्णतेचा वापर करुन केशभुषा करणा-या सर्व साधनांचा त्याग करा
  • ब्युटीपार्लर मधील रासायनिक क्रीम्स, लोशन्स टाळा
  • आपल्या डोक्याला/कवटीला मसाज करण्याचे विसरु नका
  • शक्यतो आयुर्वेदीक/हर्बल शाम्पुचाच वापर केस धुताना करा
  • केस वाळवण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर करु नका

कालिदासाची सुंदर स्त्री ही केवळ त्याची कविकल्पना नाही. स्त्री केसांविना देखील सुंदरच आहे. नितांत सुंदर आहे. पण काळाभोर, घनदाट केशसंभार असलेल्या स्त्रीचे सौंर्य अधिकच खुलुन दिसते यात संशय नाही. आपण सा-याच जणी सुंदर आहोत. आपल्यातील हे सौंदर्य जर आपण जपु शकलो, वाढवु शकलो तर आपले नुसते शरीरच सुंदर होईल असे नाही, तर आपले जीवन देखील सुंदर होईल.

मैत्रिणींनो, तुम्हाला जर कसलीही शंका, प्रश्न असेल तर अवश्य, खालील फॉर्म भरुन माझ्याशी संपर्क करा.

लव्ह यु लेडीज

तुमची मैत्रिण

पल्लवी महेश ठोंबरे

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMCIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDc4IiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNzQ0Nzk3Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzc0NDc5NyIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImE2OWQ1NGRiOGE0ZDQzYmFhN2VmOWQ0OTg2NWZkYWU5In0=

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.