Author: Mahesh Thombare

खेळाडु/खेळपटु/ॲथलेट्स साठी लॉकडाऊन नक्कीच चांगला नाहीये. किंबहुना लॉकडाऊन इथुन पुढे कुणासाठीच चांगला नाहीये. लॉकडाऊन विषयी माझे मत मी खाली थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. खरतर लॉकडाऊन करणे हा कोरोना विषाणु्च्या प्रसारावर उपाय , किमान आपल्या देशात तरी कामाचा नाहीये या मताचा मी

नमस्कार मित्रांनो, मध्यंतरी माझ्या एका मित्राशी गप्पा मारता मारता सहजच त्याच्याकडुन एक आश्चर्यकारक माहिती मिळाली. माझ्या या मित्राची मुलगी कबड्डी या खेळा मध्ये मध्ये राष्ट्रीय संघांमध्ये स्थान मिळवुन देखील, एक देखील सामना खेळु शकली नाही. एकतर अशी संधी मिळण्यासाठी खुपच परिश्रम करावे

या वर्षी मार्च महिन्यात जेव्हा कोरोनाचा भारतात शिरकाव होत होता तेव्हा आपल्याकडे सर्रास असे तर्क-वितर्क मांडले जात होते की भारतातील कडक उन्हाळ्या कोरोनाच्या क्षमतेवर प्रतिकुल परिणाम होऊन कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. थंड वातावरणात कोरोनाची ताकद वाढते व प्रादुर्भाव

तुम्हाला हे तर माहीत असेलच की मनुष्याने निसर्गनियमांमध्ये ढवळाढवळ करुन या सृष्टीचे खुप सारे नुकसान केले आहे. आपण अनेक प्रकारे प्रदुषण करतो आहोत, वायु प्रदुषण, जल प्रदुषण, ध्वनि प्रदुषण या सा-यामुळे निसर्गाच्या चक्रावर विपरीत परिणाम झालेला आपण आपल्याच डोळ्यांनी पाहतोय.

नमस्कार मंडळी आज माणसाच्या आधुनिकतेची एका अर्थाने परिक्षाच आहे. या आधुनिकतेने मनुष्यास स्पर्धक बनविले आहे, मनाची शांती नाहीशी केली आहे, व्यक्तिव्यक्तिंमध्ये दुरावे निर्माण होत आहेत, निसर्गाशी असलेली नाळ तुटत आहे; अशा एक ना अनेक गोष्टी आधुनिकतेमुळे आपणास मिळाल्या आहेत, की ज्या