
खेळपटु, व्यायामपटुंसाठी योग्य व पोषक आहार – भाग ४
नमस्कार
या लेखमालेच्या चौथ्या व शेवटच्या भागामध्ये आपण खेळपटु, व्यायामपटुंसाठी वापरता येण्यासारख्या काही प्रोटीन शेक व सप्लीमेंट विषयी माहिती घेऊयात. ही माहिती प्रश्नोत्तरांच्या रुपात आहे. काही प्रातिनिधिक प्रश्न की जे सर्वांच्या सर्व शंकांचे समाधान करतील असे मी इथे घेतले आहेत व त्यांची उत्तरे देत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कसलीही शंका प्रश्न असेल तर अवश्य माझ्या शी संपर्क करुन तुम्ही उत्तर घेऊ शकता.
लक्षात असु द्या की ही लेखमाला खेळपटु, व्यायामपटुंसाठी आहे. याचा अर्थ असे लोक, तरुण, तरुणी, मुले की जे दिवसातुन दिड ते दोन तास व्यायाम करतात, एखाद्या खेळाचा सराव करतात अशा लोकांसाठी ही लेख माला आहे. तुम्ही प्रत्यक्ष रोज इतका वेळ व्यायाम करीत जरी नसला तरी तुम्ही तुमच्या माहितीतील इतर लोकांसोबत हे लेख शेयर करु शकता जेणेकरुन योग्य व्यक्तिंपर्यंत, ज्यांना या ज्ञानाची गरज आजे त्यांच्या पर्यंत ही माहिती पोहोचेल.
प्रश्न १ – मला प्रोटीन शेक व सप्लीमेंटची गरज आहे का?
उत्तर –
हल्ली आपण जे अन्न खातो, आपली ज्या प्रकारची लाईफस्टाईल झालेली आहे, ज्यापध्दतीने अन्ना मध्ये भेसळ, अशुद्धी होत आहे, जंक फुड, हाय कॅलरी फुड या सगळ्या प्रकारामुळे प्रोटीन सप्लिमेंटची गरज नुसती खेळपटु व्यायामपटु यांनाच आहे असे नाही तर अगदी सामान्य माणसाला देखील रोजच्या रोज प्रोटीन शेकची गरज आहे. सामान्य माणसालाच जर प्रोटीन शेकची गरज आहे तर फिटनेस फ्रिकला तर नक्कीच आहे.
तुम्हाला १००% खात्री असेल की तुम्ही जे अन्न खाताय ते शुध्द आहे, सेंद्रीय आहे, भेसळमुक्त आहे तरच तुम्हाला प्रोटीन शेकची गरज नाही असे मी म्हणु शकतो. पण तसे होणे आजच्या काळात तरी अशक्य आहे.
आपण कोणता व्यायाम करतो किती वेळ करतो आपल्या शरीरात कशाची कमतरता आहे, किती कॅलरीज आपण बर्न करतो त्यावर ठरते की तुम्हाला प्रोटीन शेक ची आवश्यकता आहे की नाही. ब-याच जणांसाठी शरीराला प्रोटीन चा काही प्रमाणात योग्य पुरवठा त्यांच्या रोजच्या आहारातुन होत असतो त्यासाठी योग्य आहार असणे गरजेचे आहे. पण त्यातुन प्रोटीन ची गरज पुर्ण होत नाही. त्यामुळे प्रोटीन शेकची गरज नक्कीच आहे.
जे लोक भरपुर व्यायाम करतात त्यांसाठी अतिरिक्त प्रोटीन्स गरज असते. अर्धा तासापेक्षा जास्त व्यायाम केल्यानंतर किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये खेळल्यानंतर किंवा सराव केल्यानंतर तुमच्या स्नायुंची झिज होत असते. ही झिज लागलीच भरुन निघणे अत्यंत महत्वाचे असते. व त्यासाठीच योग्य प्रमाणात, योग्य प्रोटीन जर तुम्ही शरीराला देऊ शकलात तर खुप चांगले होईल तुमच्या आरोग्यासाठी व तुमच्या ध्येयांना गाठण्यासाठी.
तुम्ही प्रोटीन शेक निवडताना असे निवडावे की ज्यामध्ये विटामिन व मिनरल्स यांचा देखील समावेश असेल. त्यातल्या त्यात तुम्ही जर शाकाहारी असाल तर चिकन, मासे मधुन मिळणारे प्रोटीन तुम्हाला मिळत नाहीत. त्यामुळे उत्तम दर्ज्याचे शाकाहारी प्रोटीन प्रॉडक्ट तुमच्या साठी खुप महत्वाचे आहे. एखाद्या ३० ग्रॅम व्हे प्रोटीन मध्ये अर्धी चिकन ब्रेस्ट मधुन मिळेल एवढे प्रोटीन तुम्हाला मिळतात.
प्रोटिन्स खुप जास्त घेणे देखील आरोग्या साठी विशेषतः हाडांसाठी चांगले नसते. तसेच जास्त प्रोटीन मुळे चरबी वाढण्याची शक्यता देखील असतेच.
त्यामुळे तुमच्या शरीरासाठी तुमच्या वर्क आऊट , व्यायामानुसार तुम्हाला प्रोटीन शेक घेणे गरजेचे आहे हे लक्षात असु द्या.
प्रश्न २ – जेव्हा प्रत्यक्ष व्यायाम, वर्क आऊट करतो तेव्हा पाण्या व्यतिरिक्त अन्य काही पेय पिण्याची गरज आहे का?
प्रत्यक्ष व्यायाम करताना दर १५ ते २० मिनिटांच्या अंतराने पाणी पिणे गरजेचे असते. पाण्याशिवाय किंवा सोबत आपण आणखी काही पेय घेऊ शकतो का व्यायाम करताना? तर हो घेऊ शकतो. शक्यतो अशी पेये घ्यावीत ज्यांनी शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करण्यास मदत होईल. वेगवेगळे स्पोर्ट्स ड्रिंक्स बाजारात उपलब्ध आहेत. उदा – अमुल प्रो व्हे प्रोटीन, बुस्ट न्युट्रीशन ड्रिंक इत्यादी. पण लक्षात असु द्या या सोबतच पाणीदेखील खुप महत्वाचे आहे.
इनर्जी ड्रिंक (रेड बुल सारखे) घ्यावे का? तर या प्रश्नाचे सरळ उत्तर नाही असे आहे. बाजारात जी काही एनर्जी ड्रिंक्स मिळतात त्यामध्ये कॅफेन चे प्रमाण जास्त असते त्यामुळे तुम्हाला ताजे तवाने वाटेल पण कॅफेन आपल्या शरीरासाठी चांगले नसते, कॅफेन ची दुरगामी दुष्परिणाम आपल्या एकंदरीत शारीरीक, मानसिक व भावनिक आरोग्यावर होत असतात.
दुध घ्यावे का? तर मलई काढलेले दुध घेण्यास काही हरकत नाही. ते देखील तुमच्या व्यायामप्रकार, व्यायामाचा कालावधी, तुमचे वय, वजन, ऊंची इत्यादीवर ठरते की तुम्ही दुध किती प्यावे. दुधामधुन आपणास कॅल्शियम मिळते, मिनरल्स मिळतात व प्रोटीन्स देखील मिळतात.
प्रश्न ३ – मी विटामिन व मिनरल साठी सप्लीमेंट घेतले पाहिजे का?
आपला आहार जर संतुलित असेल तर वेगळे सप्लीमेंट विटामिन व मिनरल्स साठी घेण्याची गरज नाही. यासाठी आहारामध्ये पुष्कळ फळे, भाज्या, पिष्टमय पदार्थ, कमी चरबी असलेले डेयरी प्रॉडक्टस जर असतील तर यातुन तुम्हाला आवश्यक ते सर्व पोषण मिळते. आवश्यक तेवढे विटामिन व मिनरल जर मिळाले तर तुमच्या परफॉर्मंस सुधारु शकतो. काही विटामिन्स ची कमतरता एखाद्या विशिष्ट ग्रुप साठी नेहमीच असते जसे स्त्रियांमध्ये विटामिन डी ची कमतरता असते. अशा वेळेस जर या स्त्रिया व्यायाम करीत असतील तर त्यांना विटामिन सप्लीमेंट ची आवश्यकता असतेच. पण लक्षात ठेवा तुम्ही योग्य (प्रत्यक्ष भेट व बॉडी चेक अप नंतर) सल्ल्यानेच विटामिन व मिनरल सप्लीमेंट घ्या.
खेळाडु, खेळपटु, व्यायामपटुंसाठी आमच्या कडे उत्तम दर्ज्याचे प्रोटीन शेक उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार, तपासणी नंतर आम्ही आपणास योग्य विटामिन व मिनरल सप्लीमेंट देखील देऊ शकतो.
तुम्हाला कसलीही शंका, प्रश्न असेल तर अवश्य माझ्याशी संपर्क साधा.
माझा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेयर करा जेणे करुन अनेकांना या विषयी माहिती मिळेल.
धन्यवाद
आपले महेश व पल्लवी ठोंबरे
9923062525