
अमोल आणि स्मिता ची प्रेरणादायी स्टोरी…
२१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच, भारतात एक नवीनच उद्योगक्षेत्र उदयास आले. या उद्योगक्षेत्राने लाखो पदवीधारकांना नोकरीच्या नवीन संधी आणि रोजगार दिला. अनेक जण या क्षेत्रातील पाच आकडी पगाराच्या आणि झगमग, तरुणाईला आकर्षुण घेईल अशी जीवनशैली वर भाळुन या क्षेत्रामध्ये रुजु झाले. यात पगार, इंसेटीव्ह्स, अवार्ड्स, रेकगनिशन्स तर वारे माप मिळतात. पण यासर्वांसाठी अक्षरशः, शब्दशः दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो. या क्षेत्राचे नाव आहे बीपीओ.

वैद्य कुटुंब
(वजन कमी करण्यापुर्वी अमोल आणि स्मिता कसे दिसत हे पाहण्यासाठी लेख पुर्ण वाचा..)
आज मी माझ्या एका सहकारी दांपत्याची हकीकत तुम्हाला सांगणार आहे. अमोल आणि स्मिता, एका उच्च मध्यम वर्गीय कौटुंबिक आणि सांस्कृतिक पार्श्वभुमीतुन असलेले असे एक जोडपे. बीपीओ क्षेत्र चढत्या आलेखाने भारतात नोकरीच्या नवीन संधी देत होते. इजी मनी आणि तो ही फ्रेशर साठी भरपुर पैसा अशा दुहेरी आमिषाने आणि इतर क्षेत्रातील मंदीच्या वातावरणामुळे, लाखो तरुणांच्या प्रमाणे अमोल देखील बीपीओ मध्ये नोकरीस गेला. जॉब चांगला मिळाला. कॉलेजचे इतर मित्र, कुणी बिल्डरकडे, कुणी पर्यटन क्षेत्रात तर कुणी इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये नोकरीस लागले. त्यांच्या आणि अमोलच्या पगारामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. आयसींग ऑन द टॉप म्हणतात त्या प्रमाणे, दर महिन्याला इंसेंटिव्ह, रीवार्ड्स अमोल ला बीपीओ मध्ये अधिक मन लावुन काम करायला भाग पाडीत.

अमोल आणि स्मिता त्यांच्या क्लब मेंबर्स सोबत ट्रेकींग करते वेळी
बीपीओ ची ही पाहीली आपण एक बाजु. जी बाजु आपण पाहीली ती खुपच चकाकी आणि झळाळी असलेली आहे. बीपीओ ला दुसरी सुध्दा एक बाजु आहे. पैसा, उंची कपडे, भारीतले मोबाईल्स याच्या मागे दडलेली दुसरी बाजु मात्र भयानक आहे. बीपीओ मध्ये काम करण्याच्या वेळा युरोप आणि अमेरिकेच्या दिवसाच्या कामाच्या वेळांप्रमाणे असतात. म्हणजे तिकडे अमेरिकेत सकाळी ऑफीसेस उघडली की इकडे रात्री भारतात बीपीओचे काम सुरु होत असते. म्हणजेच काय तर निशाचराचे काम. निशाचर म्हणजे वटवाघुळासारखा प्राणी. दिवसा झोपायचे आणि रात्री काम करायचे. म्हणजे निसर्गाच्या अगदी विरुध्दच की. काम आणि झोप निसर्गनियमांच्या विरुध्द झाल्यामुळे साहजिकच खाण्यापिण्याच्या सवयी देखील निसर्गनियमांच्या अगदी विपरीत.
कितीही काम करायचे म्हंटले तरी रात्रीची वेळ म्हंटल्यावर थोडाफार आळस कंटाळा येणारच. त्यावर उपाय म्हणुन ही मंडळी रात्री किमान दोन तीन वेळा तरी चहा पितात. सोबतच ऑफीस केबिन मधील पाश्चात्य पध्दतीचे जेवण. जेवण कसले आलेय ते! कधी पाव तर कधी मॅगी, कधी पॅटीस तर कधी बर्गर..एकुणच काय तर या क्षेत्रात काम करणा-या बहुतांश लोकांच्या आरोग्याची वाट लागते म्हणजे लागतेच.

अमोल व स्मिता त्यांच्या क्लब मध्ये
अमोल तरी यातुन कसा वाचणार. नोकरीत केलेल्या कामाचा मोबदला पैसा आणि बढत्यांच्या रुपाने मिळत होताच. दोन वर्षांनंतर अमोल सीनीयर अनॅलिस्ट झाला होता. पण कॉलेजच्या दिवसात ६५ किलो वजन असलेला अमोल बीपीओ मध्ये गेल्यावर दोन वर्षांनी ९२ किलो वजनाचा झाला. याचे आणखी एक कारण ही आहे. या क्षेत्रात ( बीपीओ, आयटी आणि कॉर्पोरेट) काम खुर्चीवर बसुनच करायचे असते. एखाद्याने जरी ठरवले की उभे राहुन काम करायचे तरी त्याला तसे करता येत नाही. हल्ली अमेरिकेमध्ये ऑफीसेस मध्ये उभे राहुन कंप्युटर किंवा लॅपटॉप वर काम करता येईल इतक्या उंचीचे टेबल बनवुन ते ब-याच ऑफीसेस मध्ये वापरले देखील जात आहेत. अमोल देखील बसुन काम, कामांनंतर झोप, आणि पुन्हा बसुन काम ते ही निसर्गाच्या विरुध्द करुन हळुहळु (लक्षात आहे ना, वजन वाढण्याची प्रक्रिया अत्यंत सावकाश आणि छुप्या स्वरुपाची असते) ९२ किलो वजनापर्यंत पोहोचला.
वाढलेल्या वजनामुळे अमोल ला वयाच्या ३४ व्या वर्षीच उच्च रक्त दाब, खुपच जास्त आम्लपित्त इत्यादी त्रास जाणवु लागले. डॉक्टरांनी एकच सल्ला दिला व तो म्हणजे वजन कमी कर.
अमोलची पत्नी स्मिता देखील बीपीओ मध्येच काम करायची. आणि तिची हकीकत यापेक्षा वेगळी नाही. लग्नानंतर दोन मुलांचा जन्म, प्रेगंसी मुळे वाढलेले वजन, आणि पुन्हा बीपीओ जॉब. या सर्वांमुळे स्मिता देखील प्रचंड तणाव आणि धकाधकीचे जीवन जगत होती.
तिचे ही वजन वाढल्याचे तिला जाणवत होतेच.दोघांच्या आरोग्याच्या तक्रारी सारख्याच होत्या. व कारणे देखील बहुतांश सारखीच होती.

माझ्यासोबत अमोल आणि स्मिता, बाकी अनेक टीम मेंबर्स सोबत
दोघांनी मिळुन जवळ जवळ दोन वर्षे विविध पध्दतीने (इंटरनेट, व्हॉट्सॲप फेसबुक वरील तसेच व्यायाम, जिम इत्यादी) वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. पण म्हणावे असे यश येत नव्हते. जिम ला जाणे बंद झाले की पुन्हा आठवड्याभरामध्ये वजन पहिल्यासारखेच.
मी देखील त्याच कालवधीमध्ये माझे वजन १३ किलो ने कमी करुन, २१ किमी मॅरेथॉन पळालो होतो. माझ्या कडुन मार्गदर्शन घेऊन बापुसाहेब पोतदारांनी (Bapu’s Services) देखील नुकतेच त्यांचे वजन कमी केले होते. बापु आणि अमोल एकमेकांच्या नात्यातील. असेच एके वेळी गप्पा मारता मारता , अमोल आणि स्मिता ला माझ्या विषयी बापुंकडुन समजले.
दोघेही जोडीने मला भेटायला आले. माझ्या पध्दतीप्रमाणे आधी अनॅलिसिस वगेरे करुन अमोल आणि स्मिताचा वजन कमी करण्याचा प्रोग्राम सुरु झाला. अमोल ने ५ महिन्यांमध्ये २२ किलो वजन कमी केले. तर स्मिता ने ८ किलो वजन कमी केले.

रम्य अशा एका संध्याकाळी अमोल व स्मिता एका तळ्याकाठी
पाच महिन्यांमध्ये आंतर्बाह्य बदल करीत दोघांनी आश्चर्यकारक असे परिणाम मिळवले होते. ऑफीस, नातेवाईक, मित्र मंडळी, शेजारी पाजारी अगदी अवाक होऊन त्यांच्या कडे पहायचे. ब-याच लोकांनी अमोल ला विचारले की तुम्ही वजन कसे कमी केले? आम्हाला सुध्दा मदत करा?
मग अमोल ने हे अशा चौकश्यांविषयी मला सांगितले. व सल्ला विचारला. मी मग अमोल व स्मिताला पुर्ण ट्रेनिंग देऊन, त्यांना त्यांचा स्वतःचा क्लब सुरु करण्यास प्रोत्साहन दिले. मी फक्त निमित्त मात्र आहे. मुळातच मेहनती आणि चिकाटी वृत्तीचा अमोल आणि स्मिता, ने गेली दोन वर्षे अशक्य ते शक्य करुन दाखवले आहे. सद्यस्थितीला दोघे एकत्र काम करतात, ते ही दिवसातुन फक्त ४ च तास आणि महिना दिड लाखाच्या घरात उत्पन्न कमावितात. बीपीओ क्षेत्र कधीच सुटले.

१० किमी मॅरेथॉन पळाल्यानंतर अमोल चा फोटो
कधी कधी अनौपचारीक गप्पा मारताना अमोल आणि स्मिता सांगतात की हा नव्याने निवडलेला व्यवसाय म्हणजे एका अर्थाने समाजाची सेवाच आहे. या व्यवसायात मी, अमोल, स्मिता , आम्ही लोकांच्या जीवनशैली मध्ये आमुलाग्र बदल करतो. अनेकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यामध्ये आमचा खारीचा वाटा असतो, याचे समाधान, अमोल आणि स्मिता ला महिन्याला मिळणा-या लाखो रुपयांपेक्षा जास्त मुल्यवान आहे.
अमोल वैद्य

स्मिता वैद्य