Stay Fit Pune - The weight loss center

अमित ची यशोगाथा

सांगलीतील एका खेडेगावात, एका सामान्य कुटूंबामध्ये जन्मलेला ‘तो’. कसलीही ग्लॅमरस कौटुंबिक पार्श्वभुमी नसताना देखील तो स्वःतच्या मेहनत, जिद्दीच्या जोरावर, अनेक राज्य, राष्ट्रिय स्तरावरीर स्पर्धा जिंकुन, आज ऑलिंपिक, एशियन सारख्या आंतरराष्ट्रिय स्पर्धामद्ये खेळुन भारतासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न पाहतोय.

ही गोष्ट प्रथम दर्शनी एखाद्या सिनेमाची पटकथाच वाटते आहे, बरोबर ना?

पण ही कोणत्याही सिनेमाची कथा नाहीये मित्रांनो.  ही आहे सत्यकथा अमित भडकमकर नावाच्या एका भयंकर आत्मविश्वासु, कष्टाळु अशा सांगलीतील बांबवडे या गावातील युवकाची.

एकदा शाळेमध्ये सहज म्ह्णुन धावण्याच्या एका स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला व त्यात त्याचा प्रथम क्रमांक आला. आपल्या बाबतीत ही असे घडले असेलच. मी देखील शाळेत असताना विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला व काही स्पर्धांमध्ये यशस्वी सुध्दा झालो पण पुढच्या आयुष्यात माझ्या लक्षात देखील राहिल्या नाहीत त्या स्पर्धा व त्यातील यश. अमित मात्र त्याची ती स्पर्धा व त्यातील ते पहिले सुवर्णपदक विसरला नाही.

खेळात आवड जरी निर्माण झाली तरी त्याने शिक्षणाचा मार्ग सोडला नाही. इंजिनियरींग मध्ये डिल्पोमाला प्रवेश घेतला. रनिंग या खेळ प्रकारात आवड असल्याने स्वःतहुनच त्याने प्रॅक्टीस करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातुन असल्याने मुळातच या खेळातील अनेक तांत्रिक बाबी त्याला माहित देखील नव्हत्या आणि पुण्या सारख्या शहरात येईपर्यंत त्याला त्या समजल्या देखील नाहीत.

ग्रामीण भागातील मुले व खेळातील संधी याविषयी अमित म्हणतो,”ग्रामीण भागात टॅलेंट 
जबरदस्त आहे. मुले मुळातच काटक असतात, मेहनती असतात. पण त्यांना योग्य मार्गदर्शन 
कधीच मिळत नाही. नुसते मार्गदर्शनच नाही तर त्या मुलांमधील ते कौशल्य कुण्या पारखी 
व्यक्तिने ओळखुन त्याला त्या खेळामध्ये प्रोत्साहन देखील मिळेल इतपत व्यवस्था देखील 
ग्रामीण भागात नाही. व असे होत असल्याने ग्रामीण भागातील हजारो मुले ज्यामध्ये क्षमता,
कौशल्य, जिद्द असते ते कधीच खेळ-क्रिडा संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत”

अमितने ला ग्रामीण तसेच मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या बाबतीत मांडलेले हे मत त्याच्या स्वःतच्या अनुभवातुन आलेले आहे.

कसलेही मार्गदर्शन, कोचिंग नसताना अमित ने सन २०१२ व २०१३ मध्ये इंटर-इंजियनियरींग डिप्लोमा मीट या टेक्निकल बोर्डाच्या, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अनुक्रमे सिल्हर व ब्रॉंझ पदके मिळवली. एकलव्यासारखी त्याची क्रिडा-साधना सुरु होती.

 

पदविका पुर्ण केल्यावर मात्र त्याने निर्धारच केला की या खेळामध्ये पुढचे पाऊल टाकायचेच. पण सांगली-कोल्हापुर मध्ये त्याला पाहिजे तसे प्रशिक्षक मिळणार नव्हते म्हणुन त्याने पुणे शहरात यायचे ठरवले व त्याप्रमाणे तो पुण्यात दाखल झाला देखील. आता एकलव्यासारखे न राहता अर्जुन व्हायचे, योग्य मार्गदर्शन मिळवायचे, तांत्रिक बाबी समजुन घ्यायच्या, शिकायच्या असा निर्धार करुन पुण्यात आलेला अमित, पुण्यात मात्र थोडा बिचकला. याचे कारण होते पुण्यात राहणे-खाणे याचा खर्च कसा मिळवायचा. घरची आर्थिक परीस्थिती उत्तम आहेच. पण संस्कार ही सर्वोत्तम असल्याने अमित ने वडीलांकडुन शक्य तितकी कमी आर्थिक मदत घेऊन, किंवा अजिबात न घेऊन पुण्यात राहण्याचे ठरवले होते. पण पुण्यातील राहणीमानचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे आपल्या सत्यकथेतील नायकाने चक्क मॅक्डोनल्ड्स मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याप्रमाणे सलग तीन वर्षे नोकरी करुन, इंजिनियरींगच्या पदवीचा अभ्यास करुन राहिलेल्या वेळामध्ये प्रॅक्टीस केली. पण अजुनही योग्य मार्गदर्शक-कोच मिळालेला नव्हता.

अशाचत त्याची भेट आदीनाथ नाईक या भन्नाट क्रिडा मार्गदर्शकाशी झाली. नाईक सरांना अमितचा स्वभाव व मेहनती बाणा खुप आवडला. नाईक सरांनी अमितला रनिंग मधील बारकाव्यांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. एकलव्याला आता द्रोणाचार्य मिळाला. मग काय अमित ने आपल्या ध्येयाशी एकनिष्ट राहुन जास्तीत जास्त वेळ खेळासाठी देण्यास सुरुवात केली. सोबत नोकरी व इंजिनियरींगचे शिक्षण सुरु होतेच.

एकेका स्पर्धेमध्ये भाग घेण्यास सुरुवात झाली. विविध पदके आता त्याच्या घराच्या भिंतीवर लटकावयास सुरुवात झाली.

ॲथेलेट ने त्याच्या त्याच्या खेळाची तयारी करताना कशी करावी या विषयी अमित सांगतो,
”भारतात मुळातच चपळ, काटक शरीरयष्टी असणारी मुले-मुली आहेत. खेळाची तयारी 
करताना आपले खेळाडु अक्षरशः जीव ओतुन सराव करताना मी पाहिले आहे. शारीरीक 
मेहनत, कष्ट हे गरजेचे आहेच त्यासोबतच आवश्यकता आहे योग्य तंत्र व पोषक आहाराची. 
जे खेळाडु दिवसातील ४-५ तास ट्रेनिंग करतात त्यांच्या शरीराची झीज लवकर भरुन 
येण्यासाठी व परफॉर्मन्स सुधारण्यासाठी योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स व प्रोटीन्स ची 
गरज असते व नेमके भारतात याच गोष्टी मध्ये खेळाडु कमी पडतात. अपार कष्ट 
करुन सराव करणा-या आपल्या मुला-मुलींना तंत्र व पोषण नेहमीच कमी पडते.”

 

२०१४ मध्ये आयोजित केलेल्या आयडीएसए गेम्स मध्ये, राज्य स्तरावर सुवर्णपदक मिळविले.

२०१७ मध्ये अमित ने आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले. त्या वर्षी अश्वमेध गेम्स मध्ये देखील भाग घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली.

२०१७ व २०१८ अशी सलग दोन वर्षे YCMOU विद्यापीठामध्ये सुवर्णपदक मिळविले. २०१६ मधील रुरल गेम्स मध्ये देखील सुवर्णपदक मिळविले.

सोबतच इतर डझन भर स्थानिक, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने अनेक पदके मिळविली आहेतच.

खेळाचे तंत्र अमित, नाईक सरांकडुन शिकला व अजुन ही शिकत आहे. सोबतच योग्य पोषण देखील खेळाडुंसाठी अतिमहत्वाचे असल्याचे समजल्याने त्याने माझ्याशी संपर्क साधला. त्याच्या एकुणच दिनचर्येमध्ये शारीरीक कष्ट खुपच जास्त होत असल्याने व त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याची स्वप्ने पुर्ण करण्याच्या त्याच्या जिद्दीने त्याने माझ्याकडुन न्युट्रीशन सपोर्ट साठी मार्गदर्शन घेतले. या न्युट्रीशन सपोर्ट मुळे त्याला येणारा थकवा कमी झाला. मसल्सची झीज लवकर भरुन येते तसेच त्याच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली.

४०० मीटर स्प्रिंट मध्ये वेळेच्या बाबतीत सुधारणा करीत तो सध्या ४८ सेकंदात पुर्ण करतो. धावण्याच्या शर्यतीमध्ये एकेका सेकंदालाच नव्हे तर सेकंदाच्या एकेका भागाला (मिलीसेकंदाला) देखील खुप महत्व असते. त्यात एक दोन सेंकदांची सुधारणा आणण्यासाठी स्टॅमिना वाढणे व मसल्स ची झीज भरुन येणे महत्वाचे आहे.

अमितच्या यशाचे रहस्य त्याच्या मेहनतीसोबतच शिकण्याच्या त्याच्या वृतीमध्ये देखील दडलेले आहे. जिथे जिथे म्हणुन काही शिकता येईल तेथुन तो नवनवीन गोष्टी शिकत असतो.

आणि मागील काही वर्षांमध्ये अमित नुसताच शिकणारा राहिलेला नाही बर का! अमित स्वतः एक कोच व फिटनेस कोच म्हणुन काम करु लागला आहे. दररोज तो, पुणे शहरातील ५० मुला-मुलींना ॲथेलेटीक्स चे प्रशिक्षण देतो. सकाळी मोठ्यांसाठी फिटनेस बॅच घेतो.

 

अमित ने इंजिनियरींग पुर्ण केले आणि आता त्याचा पुढचा मैलाचा दगड आहे आशियन स्पर्धा व ऑलिंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करुन देशाला पदक मिळवुन द्यायचे.

अमित च्या पुढच्या उज्वल वाटचालीस आम्हा स्टे फिट पुणे च्या टीम कडुन भरभरुन शुभेच्छा. त्याचे कष्ट व ईश्वराची कृपा दोहोंच्या योगाने आपल्या भारतासाठी आंतरराष्ट्रीत स्तरावर तो चमकदार कामगिरी करेल यात शंका नाहीये.

अमित लवकरच कोथरुड येथील थोरात उद्यान परिसरात, दररोज सकाळी फिटनेस कोचिंग सुरु करणार आहे. तुम्हाला जर त्याच्या मार्गदर्शनाखाली तंदुरुस्त व्हायचे असेल तर अवश्य त्याच्या फिटनेस कोचिंगचा फायदा तुम्ही करुन घ्या.

अमित चा मोबाईल नंबर – 90962 47296

कळावे

आपलेच

महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.