Stay Fit Pune - The weight loss center

फिटनेस मधील कर्तृत्ववान नऊ स्त्रियांची माहिती

भारतात फिटनेस किंवा शारीरीक क्षमतेचा कस लावणा-या गोष्टींच्या बाबतीत लोकप्रियता काही नवीन नाही. भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातुन, खेळ-कलेच्या छंदातुन फिटनेसचा मंत्र सामान्य जनजीवनामध्ये अगदी रुढ झालेला होता. अगदी दक्षिणेकडील कलरीपट्टी पासुन ते उत्तरेतील दंगल सारखे खेळ. नृत्याविष्कारातुन देखील फिटनेस अगदी प्रत्येक प्रदेशाचा एक अविभाज्य भाग बनली होती. आजही आहे. हेच काय वारकरी सांप्रदायामध्ये देखील विशिष्ट खेळांच्या माध्यमातुन तुम्हाला तंदुरुस्तीची साधना करणारे अनेक वारकरी दिसतील. आणि सर्वात मह्त्वाची बाब म्हणजे या सर्वांमध्ये पुरुष जितके रस घ्यायचे, त्याच्याही पेक्षा जास्त आवड आणि कौशल्य भारतीय स्त्रियांकडे होते.

मध्यंतरीच्या काळात मात्र, काही अनिष्ट विचारांनी, प्रथांनी समाजाच्या मनावर आघात केले व शारीरीक कष्टाचे, मेहनतीचे खेळ, व्यायाम आदी केवळ पुरुषांचीच मक्तेदारी आहे असा गैरसमज, अंधश्रध्दा प्रचलित झाली. मुलींनी घराबाहेर पडुच नये , स्त्रियांनी केवळ चुल आणि मुल हेच करावे असे अनिष्ट प्रघात काळाच्या ओघात सुरु झाले.

पण मित्रांनो काळा बदलतोय. आणि याच बदलणा-या काळाच्या मानगुटीवर स्वार होऊन हजारो स्त्रिया, तरुणी, मुली तंदुरुस्ती, फिटनेस क्षेत्रात उच्चांक प्रस्थापित करीत आहेत. आमच्याच मुळशी तालुक्यातील दोन उदाहरणे तुर्त देतो जेणॅ करुन, खुळचट प्रथा परंपरांच्या भिंतीं ओलांडुन, स्त्री-शक्ती, मातृशक्ती कशा पध्दतीने नवनवीन यश-शिखरे पादाक्रांत करीत आहेत हे समजेल.

पहिले आहे कुमारी कोमल गोळे या मुलीचे उदाहरण. मुळशीतील पिरंगुट सारख्या गावातील या मुलीने राष्ट्रीय स्तरावर कुस्ती सारख्या शारीरीक मेहनतीच्या खेळात महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. आता तिची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.

दुसरे उदाहरण आहे श्रेयाचे.

मुळशीकर कन्या श्रेया कंधारे हीने 9 व्या आशियाई योगा चॅम्पियनशीप क्रिडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दक्षिण कोरिया येथील योसु या शहरात ही स्पर्धा पार पडली. दुबई, व्हिएतनाम, मलेशिया, ईराण, थायलंड, सिंगापूर यांसह नामवंत आशियाई देश या स्पर्धेत सहभागी होत असतात. श्रेयाचे संपुर्ण मुळशीकर तसेच भारतीयांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे

अशी पुष्कळ नावे सांगता येतील. प्रत्येक स्त्रीमध्ये निसर्गाने अमर्यादा शक्ति दिलेली आहे. चुकिच्या सामाजिक रुढी, बंधनात अडकुन पडल्याने या शक्तिचा काही अवधीकरीता विसर पडल्यासारखे झाले होते एवढेच. पण आता पराक्रमाच्या सुर्योदयाने, बंधनाचे हे काळे दुर सारले गेले आहेत. व फिटनेस ही केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नाहीये हे स्त्रीने सिध्द करुन दाखवले आहे.

आज आपण भारतातील नऊ अशा स्त्रियांविषयी जाणुन घेउयात की ज्यांनी लाखो करोडो लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे. व्यायामाचे विविध प्रकार, आहार-विहार आदी गोष्टींमध्ये या स्त्रिया खुप पुढे आहेत. सोशल मिडीयावर त्यांचे लाखोंच्या संख्येने चाहते आहेत. प्रत्येक स्त्रीची स्वतःची वेगळी ओळख आहे.स्वतःचे वेगळे कर्तृत्व आहे. स्वतःचा वेगळा यशाचा चढता आलेख आहे. यातील काही तरुणी चक्क बॉडी बिल्डींग सारख्या स्पर्धा खेळतात. डोले-शोले ही बाब देखील केवळ पुरुषांनीच मिरवायची आहे हा गैरसमज देखील त्यांनी दुरु केला आहे. काही इतर नोकरी व्यवसाय करुन फिटनेसला जीवनामध्ये सर्वात वरचे स्थान देतात व त्यासाठी नेमाने वर्क-आऊट करतात. काही स्त्रिया भारतातील अनेक सिने कलाकारांना फिटनेस चे धडे देतात. काही तरुणी स्वतःचे फिटनेस सेंटर्स चालवतात. असे असुन देखील या सर्व स्त्रियांमध्ये एक समाजनता आहे व ती म्हणजे त्या जबरद्स्त फिट आहेत. तंदुरुस्त आहेत. चला तर मग आपण थोडक्यात माहीती करुन घेऊ या फिट-तरुणींबाबत!

जान्हवी पांडव

ही पक्की मराठ मोळी तरुणी बेधडक तर आहेच पण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तिने अद्याप अनेक बक्षीसे जिंकली आहेत. वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्स वर ती अनेकदा व्यायामाचे मार्गदर्शन करताना तुम्हाला दिसली असेल. ती एरोबिक एक्सपर्ट असुन पर्सनल ट्रेनर म्हणुन देखील काम करते.

जान्हवीला इन्स्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.instagram.com/janvipandav

सपना व्यास पटेल

दोन वर्षांपुर्वी या मुलीने चक्क इंटरनेट लाच वेड लावल होत. भाजपा या राजकीय पक्षाची आमदार म्हणुन तिच्या फोटो सहीत एक पोस्ट त्यावेळी व्हायरल झाली होती. २०१७ साली अवघ्या सात महिन्यांमध्ये तिने चक्क ३३ किलो इतके वजन कमी केले. तो पर्यंत सपना व्यास पटेल कोण हे फारसे कुणाला माहिती नव्हते. पण तिच्या वेटलॉस ची स्टोरी तिने तिच्या सोशल मीडीया प्रोफाईल वर पोस्ट केली आणि त्यानंतर ती बनली एक फिटनेस आयकॉन. ती बिजनेस मॅनेजमेंट ची विद्यार्थीनी असुन सध्या ती फिटनेस कोच म्हणुन काम करते आहे.

सपना व्यास पटेल ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

https://www.instagram.com/coachsapna

याश्मीन चौहान

२०१६ सालची मिस एशिया स्पर्धा जिंकणारी यश्मीन चौहान एक सशक्त नारी असुन तिने त्याच वर्षी मिस इंडिया २०१६ ब्युटी पेईजंट ही स्पर्धा देखील जिंकली.

 

यश्मीन चौहान ला फॉलो करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

https://www.instagram.com/yashmeenchauhan/

श्वेता मेहता

एम टीव्ही रोडीज मध्ये एक तरुणी सर्वांच्याच लक्षात राहीली ती हिच श्वेता मेहता. लक्षात राहण्याचे कारणही तसेच आहे. ऑडीशन्स दरम्यान हिने प्रसिध्द क्रिकेट पटु हरभजन सिंगलाच चक्क उचलुन घेतले. एम टीव्ही रोडीज मध्ये तर ती जिंकलीच पण तिने हे देखील दाखवुन दिले की शारीरीक क्षमतेमध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा अजिबात कमी नसतात. वेगवेगळ्या स्पर्धा मध्ये भाग घेऊन तिने विजेतेपद मिळविले आहे. मुळची सॉफ्टवेयर इंजिनियर असलेली श्वेता सध्या एक फिटनेस कोच म्हणुन काम करते. या कामातुन आजवर तिने हजारो लोकांना तंदुर्रुस्तीचा मंत्र दिला आहे. कंप्ट्युटर कोडींग ते फिटनेस असा थक्क करणारा प्रवास तिने स्वतः स्वीकारला. घरातील चार भावंडामध्ये एकुलती एक मुलगी असुनही श्वेता ने फिटनेस क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे.

सुषमा राज

 

श्वेता राठोड

 

काही लोक जगात आलेलेच असतात काहीतरी नवीन पायंडे पाडण्यासाठे श्वेता राठोड देखील असेच एक नाव आहे. ही तरुणी २०१४ मधील जागतिक बोडी बिल्डींग स्पर्धेत भारतासाठी पदक मिळविणारी पहिली तरुणी आहे.

तिला मिळालेले मान

  • Miss world 2014 fitness physique
  • Miss Asia 2015 Fitness physique
  • Hattrick Miss India sports physique champion 2015, 2016,2017
  • Awarded by Dubai Government as International Fitness Diva title 2017

श्वेता ला फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा

https://www.instagram.com/ishwetarathore

श्वेता साखरकर

ही मुंबई मधील एक कन्यका आहे. बिकिनी कॉम्पीटीशन मध्ये नेहमी सहभागी होत असते. ती एक राष्ट्रीय फुटबॉल पटु व व्हॉलीबॉल पटु आहे.

सोनाली स्वामी

 

आपल्याकडे साधारण पणे एक गैरसमज स्त्रिया पटकन करुन घेतात की मुले झाल्यावर तब्येत खराब होणारच. फिटनेस वगेरे चोचले लग्नाआधीच किंवा मुले होत नाहीत तोवरच करायचे. सोनाली स्वामी मात्र एक अशी स्त्री आहे जी दोन मुलांची आई असुन देखील एक आदर्श फिटनेस दिवा बनली आहे. फिट फॅक्टर, मसल मॅनिया या स्पर्धांमध्ये तिने बक्षीसे मिळविली आहेत.

सोनाली ला फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा

https://www.instagram.com/sonali_swami/

हर्ज हदाणी

Reflex Athlete Harj Hadani aka. Skinnyroti knows all too well what it takes to be a champion! Daily Harj operates on a…

Posted by Reflex Abbotsford on Friday, July 22, 2016

फीमेल बॉडीबिल्डर म्हणुन प्रसिध्द असलेली ही फिटनेस मॉडेल चक्क दोन मुलांची आई आहे. दुस-या मुलाचा जन्म झाल्यानंतर जेव्हा तिला जाणवले की ती स्थुल होऊ लागली आहे, तेव्हा तिने सडपातळ होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. स्वतः साठी म्हणुन सुरु केलेला तंदुरुस्तीचा प्रवासात पुढे जाऊन तिने हजारो स्त्री पुरुषांना आरोग्याचा मंत्र दिला.

हर्ज ला फॉलो करण्यासाठी क्लिक करा.

https://www.instagram.com/skinnyroti/

नुसते सुंदर दिसणे हेच नव्हे तर फिट, तंदुरुस्त राहणे, व्यायाम करणे, कुस्ती करणे, धावणे, पोहणे, योगासने, इत्यादी अनेक अंगमेहनतीच्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आज पुढे येताना दिसत आहे. या स्त्री-शक्तिला, या मातृशक्ति ला या नव दुर्गांना आमचा साष्टांग नमस्कार.

तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर अवश्य शेयर करा.

चला तर मग निरामय निरोगी जीवन जगण्याचा निर्धार करु व व्यायाम आपल्या सवयीची भाग बनवुयात.

कळावे

आपले

महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNzU4MzQ0Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzc1ODM0NCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

 

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.