
३१ डिसेंबर म्हणजे दारु आणि दारु म्हणजे ?
काल एक जिवलग मित्र भेटला. अगदी अनेक वर्षांनंतर भेट होत होती आमची. त्यामुळे गप्पांच्या ओघात सर्व जुन्या मित्रांना एकत्र करुन एखादे गेट टुगेदर अरेंज करावे असा विचार त्याने मांडला. मी ही हो म्हणालो. आता भेटायचे कधी हा निर्णय व्हायचा बाकी होता. त्यावर तो बोलला की ३१ डिसेंबर सुध्दा साजरा करुयात. एखाद्या रीसॉर्ट मध्ये जाऊन मुक्काम खाणे पिणे आणि नाचणे!!
कल्पना काही वाईट नव्हती पण माझा ३१ डिसेंबरचा प्लान आधीच ठरला असल्याने मी ३१ डिसेंबरला गर्दी गोंगाट नाच गाणी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दारु पार्ट्या यापासुन दुर, निसर्गात बायको मुलांसोबत जाणार असल्याचे सांगितले. त्यावर साहजिकच त्याची प्रतिक्रिया एखाद्या जिगरी दोस्ताची असते तशीच होती. काही नाही वजन वाढत रे चमचमीत खाल्ल्याने. मी दारु पित नाही हे त्याला माहित आहेच. अरे चल रे जाऊ मजा करु इत्यादी इत्यादी. शेवटी जानेवारीच्या शेवटास गेट टुगेदर करायचे ठरवले गेले.
त्यानंतर मग माझ्या मनात विचार आला की खरच ३१ डिसेंबर च्या रात्री किंवा कधीही दारु पिल्यावर नक्की काय होते, या विषयी सविस्तर लिहावे. म्हणुनच हा लेखन प्रपंच.
उत्सुकता, मित्रांसोबत असताना, सामाजिक दबावापोटी, तणाव घालवण्यासाठी, एकटेपणा, झोप उडाल्याने, वास्तवापासून दूर जाण्यासाठी किंवा सहज उपलब्ध असल्याने.. दारूचा एकच प्याला जवळ करण्यासाठी यातील एक कारणही पुरेसे ठरते. आता तर नवीन वर्षांचे स्वागत करण्याचे निमित्त साधून जंगी पाटर्य़ाचे बेत आखले गेले आहेत. या निमित्ताने आपणही दारू म्हणजे नेमके काय, दारूमधील अल्कोहोलचे प्रमाण व त्यामुळे शरीरावर होणारा नेमका परिणाम याची माहिती घ्यायला काय हरकत आहे?
सर्वात प्रथम आपण हे पाहुयात दारु म्हणजे नक्की काय ते ?
दारूला शास्त्रीय भाषेत अल्कोहोल म्हटले जाते. कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन या अणूंनी मिळुन अल्कोहोलचे रेणु बनतात. कार्बन आणि हायड्रॉक्साइलच्या साखळ्यांच्या गुंतागुंतीवरून अल्कोहोलचे प्राथमिक पडतात. मिथेनॉल आणि इथेनॉल हे अल्कोहोलचे मुख्य प्रकार आहेत. इथेनॉल म्हणजे दारूत वापरले जाणारे अल्कोहोल.
इथेनॉल पेक्षा ही उच्च प्रकारातील अल्कोहोल हे इंधन, साठवणुकीसाठी किंवा अत्तरे, परफ्युममध्ये वापरले जाते.
आपण (मी नाही बरका !) कोणती दारु पितो त्यावरुन ठरते की आपल्या शरीरामध्ये अल्कोहोल किती जाणार आहे. उदा माईल्ड बीयर मध्ये साधारण पणे २ ते ३ टक्के अल्कोहोल असते तर कडक बियर मध्ये ६ ते ८ टक्क्यापर्यंत अल्कोहोल चे प्रमाण असते. तेच व्हिस्की, रम, तकिला, व्होडका, जिन घेतली तर त्यात हे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांपर्यंत असते. आणि अगदी संत्रा टॅंगो पंच सारख्या सरकारमान्य देशी दारु घेतल्या तर त्या हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत असते.
आपण पाहत असतो की दारु कुणाला थोडी प्यायली तरी जास्त चढते आणि कुणाला कितीही प्यायली तरी अजिबात चढत नाही. दारु चढली याचा अर्थ ती शरीराला ती पचवता आली नाही. आणि कमी चढली किंवा अजिबात चढली नाही तर समजा की शरीराने दारु पचवली आहे. दारु पचवण्यासाठी देखील अन्न पचवण्यासाठी ज्या काही क्रिया शरीरास कराव्या लागतात अगदी त्याच होतात प्रसंगी यकृतावर जास्त ताण येतो. तो कधी येतो तर जेव्हा तुमचे चयापचय म्हणजेच मेटॅबॉलिज्म जर चांगले नसेल तर.
मग प्रश्न असा येतो की काय ज्यांचे मेटॅबॉलिज्म चांगले आहे त्यांनी दारु बिनधास्त प्यावी का? आणि ज्यांचे मेटॅबॉलिज्म चांगले नाही त्या दारु पिणे बंद केले तर त्यांचे आरोग्य सुधारेल?
दारु महत्वाची नाहीये. महत्वाचे आहे तुमचे मेटॅबोलिज्म. चांगले मेटॅबॉलिज्म तुम्हाला चांगल्या जीवनशैलीमधुन म्हणजे योग्य आहार व विहार या मधुन मिळते. व योग्य आहारामध्ये दारु ला स्थान आहे का? तर आहे. दारु च्या एका पेग मध्ये साधारण १०० ते १५० कॅलरीज असतात. आपल्या शरीराच्या चलनवलनासाठी आपल्याला किती कॅलरी लागतात त्यापेक्ष जास्त कॅलरी दारु मधुन मिळाल्या काय किंवा दारु सोबतच्या बेसुमार तळलेल्या मसालेदार चकण्यामधुन मिळाल्या काय, जास्त कॅलरीचे रुपांतर चरबीमध्ये होत असते. त्यामुळे किती प्यावी याचे भान असणारासाठी त्यांच्या योग्य आहारामध्ये दारुला स्थान असावयास काहीच हरकत नाही.
किंवा ज्यांना अतिरीक्त कॅलरीज कशा जाळायच्या (म्हणजेच विहार – व्यायाम , कष्ट) हे माहित आहे त्यांच्या देखील जीवनशैलीमध्ये मर्यादीत दारुला जागा असु शकते.
पण दारु प्यायल्यामुळे नक्की काय होते? चला जाणुन घेवुयात
एक पेग दारु किंवा एक कॅन बीयर घशाखाली उतरली की काय होते?
बडबड वाढते आणि ताण दूर होतो.
आत्मविश्वास वाढतो.
गाडी चालविण्याच्या क्षमतेत मात्र गडबड होते.
दोन पेग दारु किंवा २ कॅन बीयर मारल्यावर काय होते?
रक्तप्रवाहाची गती वाढते.
लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
शरीरातील पाणी कमी होते. हँगओव्हरची सुरुवात.
तीन पेग दारु म्हणजेच एक क्वार्टर किंवा ३ कॅन बीयर रिचवल्यावर काय होते?
प्रतिक्रिया देण्याची गती मंदावते.
यकृताला अधिक काम करावे लागते.
कामवासना वाढण्याची शक्यता असते.
चार पेग किंवा त्यापेक्षा जास्त दारु किंवा ४ कॅन बीयर मारल्यावर काय होते?
मनाचा गोंधळ वाढतो.
भावुकता वाढते.
या पातळीवर कामवासना कमी होण्याची शक्यता असते.
आणि पार्टीमध्ये हा पठ्ठ्या म्हणतो “बिल मी भरणार आज” पण बिल भरण्याचे वेळ येईपर्यंत हा आडवा झालेला असतो.
दारु पिल्याच्या दुस-या दिवशी जर सकाळी झोपेतुन उठल्यावर देखील डोके ठिकाणावर नसेल म्हणजेच हॅंगओव्हर असेल तर समजा की तुमचे मेटॅबॉलिज्म चांगले नाही किंवा तुम्ही तुमच्या लायकीपेक्षा जास्त पिण्याचा अट्टाहास केलात.
दारु शरीरातील पाणी कमी करते. लघवीवाटे सारे पाणी निघुन जाते, त्यामुळे दारु पितानाच भरपुर पाणी प्या. आणि शक्यतो सोडा थंडपेय टाळा. पाण्यातच घ्या. तसेच दुस-या दिवशी हॅंगओव्हर झालाच तर लागलीच भरपुर पाणी ढोसा (रात्री ढोसली ना दारु त्याहीपेक्षा जास्त !!)
असो, मला वाटतय मी जरा जास्तच परखड भाषेत लिहिलय शेवटी शेवटी… ऐकल्यासारखी वाटतेय का ही भाषा ?
दारु नाही पिलात तर उत्तमच. पण जर पिणारच असाल तर जरा सांभाळुनच.
नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
(टिप – ज्या लोकांना दारु प्यायची सवयच आहे आणि तरीदेखील वजन कमी करायचे असेल पोटावरील चरबी कमी करायची असेल तर अशांनी आवर्जुन आमच्याशी संपर्क साधा. )
तुमचे निरामय आरोग्याचे सांगाती
महेश आणि पल्लवी ठोंबरे
9923062525